‘पुणेरी’राजकारण- दोन खासदारांना भारी …. एक आमदार

Date:

 

पुणे-

 यापूर्वीच्या काळात लोकसभेत निवडून गेलेला आणि राज्यसभेत निवडून गेलेला खासदार काँग्रेस ने पुण्याचा नेता बनविला होता , राष्ट्रवादीने ही परंपरा खंडित केली असे म्हणता येणार नाही . कारण काहीही केले तरी राष्ट्रवादीचे नेतृत्व हे कायम शरद पवारांकडे राहिले आहे .सुप्रिया सुळे या नेहमीच अजितदादांच्या पक्षांतर्गत स्पर्धक त्यामुळेच मानल्या गेल्या . पण एकूणच कॉंग्रेसच्या नेता देण्याच्या परंपरेला आता इतिहासातच जमा व्हावे लागणार आहे . बॅरीस्टर गाडगीळ यांच्याकडून शरद पवारांनीच कलमाडीला पुढे करून पुण्याचे नेतृत्व  बदलले .  आता त्याला ही बराच अवधी लोटला आहे . जुने पुणे अल्पमात्र बनले आहे .. आणि पुण्यात बहुजन बहुआयामी .. विविध जातीजामातीचा समाज प्रचंड संख्येने आला आहे . कलमाडीच्या नेतृत्वानंतर अजितदादांचे नेतृत्व महापालिकेला मिळाले , ज्यास अगदी  पर्यायाने शहराचे नेतृत्व मानले गेले . पण खऱ्या  अर्थाने पुण्याला नेता..  असा याही काळात मिळाला नाही. आता तो गिरीश बापटांच्या रूपाने मिळतो आहे . पुण्यात राहणारा , पुण्याची जाण असणारा हा नेता आहे  यात शंका नाही . पण ….

अलीकडेच पक्षात आलेले खासदार संजय काकडे हे आपल्या पक्षातील  ‘सुरेश कलमाडी’  अशी जागा  स्वतः साठी निर्माण करू शकतात .. हा धोका जेव्हा लक्षात आला तेव्हा ,खासदार अनिल  शिरोळे गट हाच केवळ त्यांचा पक्षांतर्गत विरोधक राहिला नाही तर सर्वात मोठे लक्ष्य त्यांना काकडे यांना करावे लागले .

आता इथे दिल्लीश्वर नाही ‘ मुंबईश्वर -नागपूरकर ‘ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शी असलेल्या चांगल्या संबधामुळे आणि काकडे यांची आपल्याला पुणे महापालिका जिंकायला कोणत्या स्वरूपाची मदत होवू शकते हे ओळखून ‘मुंबईश्वरांनी’ त्यांच्याकडे काही जबाबदारी टाकली होती, हे आता पर्यंत स्पष्ट झाले आहे .  . आणि काकडे यांनी उत्साहाने ती स्वीकारताच .. पुणेरी राजकारण ढवळून निघाले .

असंख्य समाजाचे मोर्चे , वाढत्या गुन्हेगारीवर समाजात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया , आणि मुख्यमंत्र्यांना  खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी सुरु असलेल्या राजकीय चढाया या अवस्थेत .. साम दाम दंड भेद .. मार्गाने निघालेल्या फडणविसांना जणू शह दिला गेला  .अर्थात तो स्व अस्तित्वासाठी होता .  आणि ‘पुण्याचा कारभारी मीच अशी डरकाळी फोडली गेली . अर्थात हि डरकाळी एका जुन्या जाणत्या निष्ठावान आमदाराची होती पण ती चक्क दोन्ही खासदारांना आव्हान देवून गेली . पर्यायाने हा प्रकार अनेकांना  ‘चाणक्यनिती’सारखा भासला  . मंत्रीपदावर असलेल्या बापट यांनी पदावर आल्यापासून अनेक टिकांचा सामना हि केला , पण पुण्याच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा हे सारे टीकाकार देखील त्यांच्या बरोबर उभे ठाकले . .हे हि येथे नमूद केले पाहिजे .

दुसरीकडे काही सामन्य कार्यकर्त्याला मात्र .. हा राष्ट्रवादीचा कावेबाजपणा असल्याचा देखील भास होतो आहे . पुण्याचा कारभारी म्हणून बापटांचेच दंड थोपटले जावेत हीच इच्छा राष्ट्रवादीतील राजकारण्यांची होती असेही आता बोलले जावू लागले आहे . असे झाले तर शहराची  मध्यवस्ती  सोडा पण बहुसंख्य जागांवर आपल्याला लढत सोपी होईल असे त्यांना वाटत असावे . मनसे आणि शिवसेना हे पक्ष बहुजन  समाजाच्या मागे नाहीच असा दावा करणाऱ्या या राजकारण्यांना कदाचित यामुळे आनंद देखील झाला असावा असे हीबोलले जाते . एकंदरीत महापालिकेच्या निवडणुका यावेळी खरोखर विकासाच्या मुद्द्यावर होणार कि साम दाम दंड भेद यावर होणार, आणि पुण्याचा नेता नेमका कोण असणार  ? या सर्व बाबी  येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होतील यात शंका नाही .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे:महापलिकेच्या मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा:निलेश निकम

पुणे- PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे याबाबतचा अहवाल...

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी...