Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पश्चिम महाराष्ट्रातील धडक मोहिमेत 3 लाख थकबाकीदारांनी भरले 75 कोटींचे वीजदेयके

Date:

पुणे, दि. 24 : पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत वीजदेयकांच्या थकबाकीपोटी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. गेल्या 10 दिवसांत 3, 84,905 थकबाकीदारांचा वीजदपुरवठा खंडित करण्यात आला. त्यातील 3,05,986 थकबाकीदारांनी 74 कोटी 70 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

गेल्या काही महिन्यांत पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलात थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्याचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी निर्देश दिले. त्यानुसार लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत 110 कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी पुणे परिमंडल- 71,946, बारामती परिमंडल- 1,50,585 व कोल्हापूर परिमंडलातील 1,62,374 अशा एकूण 3,84,905 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील 3,05,986 ग्राहकांनी 74 कोटी 70 लाख रुपयांच्या थकीत देयकांचा भरणा केला आहे व त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 79,853 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असून त्यांच्याकडे 35 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा सुरु करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेली मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देयकांच्या आकारणीबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलास देण्यात आल्या आहेत. थकीत देयकांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.


खंडित वीजजोडण्यांची

तपासणी करण्याचे निर्देश

थकीत देयकांमुळे खंडित करण्यात आलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलास करण्यात आलेल्या आहेत. सोबतच थकबाकीचा भरणा केल्यानंतर संबंधीत ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने सुरु करून देण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले आहेत.

msedcl

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...