पुणे- पुण्याला प्यायचे पाणी सुद्धा विकत देण्याचा घाट भाजपा आणि राष्ट्रवादीने घातला असून या दोघांसह काँग्रेस पक्ष असे तिघे हि सारखेच आहेत . त्यामुळे आता परिवर्तन करा आणि एकमेव शिवसेनेला साथ द्या असे आवाहान सेनेचे पुणे शहर प्रमुख माजी आमदार विनायक निम्हण यांनी येथे केले .
पुणे महानगरपालिका २०१७ शिवसेनेचाच महापौर असेल व पुणे महानगरपालिका समोर आंदोलन करणारा शिवसैनिकच उद्या पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक दिसेल, असा विश्वास विनायक निम्हण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, संपर्कप्रमुख अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपसंपर्कप्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शहरसंघटक शाम देशपांडे, अजय भोसले, सुनील टिंगरे, सचिन तावरे, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, समन्वयक, सर्व शिवसेना, युवा सेना सर्व पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात महिला आघाडीच्या भगिनी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पुणे तर्फे आज (मंगळवारी) पुणे महापालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात आलाया मोर्चाला सकाळी महात्मा फुले मंडई येथून सुरुवात झाली. यावेळी पहा ..ऐका निम्हण नेमके काय म्हणाले ..