31 मार्च 2026 पर्यंत राज्यात 4.94 लाख कोटी रुपयांहून अधिक विमा संरक्षण; एआय आणि डेटा अॅनालिटिक्सवर कंपनीचा भर
पुणे :
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सने महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत टर्म प्लॅन अर्थात रिटेल प्रोटेक्शन व्यवसायात वार्षिक आधारावर 66.3 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 पर्यंत महाराष्ट्रातील 31 लाख 92 हजार 108 व्यक्तींना विमा संरक्षण देण्यात आले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात टर्म प्लॅनबरोबरच लिंक्ड, नॉन-लिंक्ड आणि अॅन्युइटी उत्पादनांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत राज्यातील कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मूल्य अर्थात AUM 52 हजार 303 कोटी रुपये होते.
याच कालावधीत कंपनीने महाराष्ट्रात 4 लाख 94 हजार 203 कोटी रुपयांच्या विमा संरक्षण रकमेची नोंद केली आहे. तसेच गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रातील ग्राहकांना एकूण 15 हजार 655 कोटी रुपयांचे विविध लाभ अदा केल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महाराष्ट्रात विस्तृत वितरण जाळे
31 मार्च 2026 पर्यंत महाराष्ट्रात कंपनीच्या 45 शाखा, 28 हजार 244 सल्लागार, 11 हजार 310 भागीदार शाखा आणि 13 हजार 974 स्पेसिफाइड पर्सन कार्यरत असल्याचे कंपनीने सांगितले.
दरम्यान, संचालक मंडळाने संबंधित मंजुऱ्यांच्या अधीन राहून कंपनीचे नाव ‘आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स लिमिटेड’ असे बदलण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.
‘महाराष्ट्र धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ’
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर अमिष बँकर यांनी महाराष्ट्र कंपनीसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे सांगितले.
शहरी तसेच नव्याने विकसित होत असलेल्या केंद्रांमध्ये विम्याबाबतचा प्रतिसाद वाढत असून ग्राहक आर्थिक संरक्षण, दीर्घकालीन बचत आणि निवृत्ती नियोजनाला अधिक प्राधान्य देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कंपनीच्या वितरण जाळ्याचा विस्तार, डिजिटल क्षमता, विविध उत्पादने आणि ग्राहक संपर्कावरील गुंतवणूक यामुळे राज्यातील उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एआय, मशीन लर्निंग आणि डिजिटल केवायसीचा वापर
कंपनीने ग्राहकांचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटायझेशनचा वापर वाढवला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण बचत पॉलिसींपैकी सुमारे 54 टक्के पॉलिसी एकाच दिवशी जारी करण्यात आल्या. तसेच सुमारे 58 टक्के विमा पॉलिसी डिजिटल केवायसीच्या माध्यमातून जारी करण्यात आल्या.
कंपनीच्या सुमारे 97 टक्के सेवा सेल्फ-हेल्प किंवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
क्लेम सेटलमेंट रेशो 99.3 टक्के
आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण क्लेम सेटलमेंट रेशो 99.3 टक्के असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तपासणीची आवश्यकता नसलेल्या वैयक्तिक दाव्यांसाठी सरासरी प्रक्रिया कालावधी एक दिवस असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
31 मार्च 2026 पर्यंतच्या सात वर्षांत कंपनीने महाराष्ट्रात 5 हजार 108 कोटी रुपये मृत्यू दाव्यांपोटी अदा केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शाखा विस्तार, सल्लागारांची भरती आणि ग्राहक संपर्क उपक्रमांच्या माध्यमातून विमा सेवांची पोहोच आणखी वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

