रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्यांना हटकले; कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना

Date:

पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रकार; पोलीस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी

पुणे :

पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळांवर गांजा पिणाऱ्या काही जणांना हटकल्यानंतर त्यांनी पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात बांबल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस शिपाई अक्षय बांबल हे पुणे रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्यावर होते. त्यावेळी रेल्वे रुळांजवळ काही जण गांजा पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बांबल यांनी संबंधितांना हटकले असता, त्या टोळक्याने संतापून त्यांच्यावर हल्ला केला.

यावेळी आरोपींनी धारदार कोयत्याने अक्षय बांबल यांच्या गळ्यावर वार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस कर्मचाऱ्यावरच झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

या प्रकरणात हल्लेखोरांची संख्या नेमकी किती होती, तसेच त्यापैकी किती जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोलीस हवालदारानेच मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप; अटक,नंतर निलंबन

कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर असताना प्रकार; चतु:श्रृंगी पोलिसांकडून कारवाई पुणे :...

प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना हेरून दागिने चोरणारी टोळी जेरबंद; 15 लाखांचे सोने जप्त

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक गुन्ह्यांची उकल; समर्थ पोलिसांची कारवाई, तीन...

संतोष पंडित यांना 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

कोथरूड पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू; आयफोन, सिमकार्ड, ट्रायपॉड...

शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांच्या कालावधीची तपासणी करण्याचे निर्देश मुंबई, दि....