पुणे- राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी २२ ऑगस्ट रोजी RTO चौकाजवळील SSPMS मैदानावर होणार आहे. कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी ३० अटी आणि शर्तींसह परवानगी दिली असून सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत कार्यक्रम होणार आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी केल्या .एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना धमकावल्याचा, तसेच राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत तरुणांना धमकावत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमल्याने परिस्थिती अधिकच चिघळल्याचं दिसून आलं. यावेळी संतप्त मुला मुलींनी नेत्यांनी आपापल्या भावना माध्यमांपुढे व्यक्त केल्या …
राहुल गांधी विद्यार्थिनींशी शिक्षण, सुरक्षितता, समानता, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधी अशा विविध विषयांवर संवाद साधणार आहेत. मात्र, कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी COEP परिसरात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
ABVP च्या गुंडांनी दोन मुलींना डांबून ठेवले- विजय वडेट्टीवार
माध्यमांना प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, दोन मुलींना कोंडून ठेवले. ABVP च्या गुंडांनी तिला डांबून ठेवले, तिला धमकावले, मारहाण केली. त्या मुलीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या युवा कॉंग्रेसच्या काही मुली इथे आल्या, न्याय मागायला. ज्या दोन अनाथ मुलींना ज्या पद्धतीने हुकुमशाही, दादागिरी करण्याचे काम केले. उद्याच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे तसेच कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचे हे षड्यंत्र असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केला. तसेच जोपर्यंत त्या मुलींना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तसेच ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. यावेळी कॉंग्रेस नेते सतेज पाटील, विश्वजित कदम देखील दाखल झाले असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व नेते धरणे आंदोलनाला बसले आहेत.

