हातचलाखी करून सराफी दुकानांतून दागिने लंपास; लोहेगाव पोलिसांनी पाच जणांची टोळी पकडली

Date:

सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध; चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२६ : ज्वेलर्स दुकानात हातचलाखी करून चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा लोहेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोहेगाव पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक २०९/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेले चांदीचे दागिने आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी तपास पथकाला दिले होते.

तपासादरम्यान पोलीस अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यात कल्पना अंकुश कांबळे आणि तिचे साथीदार सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात कल्पना अंकुश कांबळे (वय ४७), पांडुरंग रामगायकवाड (वय ४२), दीक्षा वसंत शेलार (वय ३२), सुमन बाबासाहेब कोरके (वय ६२) आणि उत्तम बाबासाहेब कोरके (वय ४५) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी संबंधित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

आरोपींकडून दाखल गुन्ह्यातील चोरीचे चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-७ अविनाशकुमार, सहायक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राकेश कदम, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण पुणे.दि.२१: आगामी गणेशोत्सव आणि...

‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ प्रकरणातील महिलेला अटक

१ लाखांपासून १०० कोटींपर्यंत गुंतवणूक स्वीकारल्याचा दावा; ३० टक्के...

‘माती-पाणी संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी’ – भार्गवी चिरमुले

रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पुणे, दि. २१ : माती...