‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ प्रकरणातील महिलेला अटक

Date:

१ लाखांपासून १०० कोटींपर्यंत गुंतवणूक स्वीकारल्याचा दावा; ३० टक्के शेअर ट्रेडिंगमध्ये, ७० टक्के सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन

पुणे : जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलिसांनी राजश्री राजेश तुडयेकर (वय ४२, रा. बेळगाव, कर्नाटक) या महिलेला अटक केली आहे. ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ या नावाने कंपनीचे कार्यालय सुरू करून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘रॉयल ट्रेडिंग’ कंपनीत १ लाख रुपयांपासून १०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक स्वीकारली जात असल्याचे सांगण्यात येत होते. गुंतवणूकदारांनी दिलेल्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवली जाईल आणि उर्वरित ७० टक्के रक्कम सुरक्षित ठेवली जाईल, तसेच गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचा आरोप प्रेसनोटमध्ये आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२/२०२६ दाखल करण्यात आला असून भादंवि कलम ४०६, ४०९, ४२० तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण अधिनियम, १९९९ अर्थात MPID कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासादरम्यान अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर आरोपी महिलेला बेळगाव, कर्नाटक येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

सध्या आरोपी महिला १० ऑगस्ट २०२६ पासून न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तपासात या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून आल्याने ‘रॉयल ट्रेडिंग’ किंवा ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केलेल्या इतर गुंतवणूकदारांनी पुढे येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण पुणे.दि.२१: आगामी गणेशोत्सव आणि...

हातचलाखी करून सराफी दुकानांतून दागिने लंपास; लोहेगाव पोलिसांनी पाच जणांची टोळी पकडली

सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध; चांदीचे दागिने...

‘माती-पाणी संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी’ – भार्गवी चिरमुले

रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पुणे, दि. २१ : माती...