दिल्लीच्या आंदोलनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील CJP कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरवून घेतले ताब्यात; “लोकशाहीत प्रश्न विचारायचे नाहीत, तर कुठे विचारायचे?”

Date:

१० ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनापूर्वी पोलिसांची कारवाई; रेल्वे-मेट्रो निर्बंधांवर CJP महाराष्ट्राचा आक्षेप

पुणे : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या काही कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरवून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप CJP महाराष्ट्राने केला आहे. यापैकी पुण्याहून निघालेल्या २१ आंदोलकांना इटारसी येथे रेल्वेतून उतरवून मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून दिल्लीकडे निघालेल्या किमान ३० जणांना विविध ठिकाणी रोखल्याचे वृत्तही आहे.

CJP महाराष्ट्राच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील नियोजित आंदोलनासाठी देशभरातून, विशेषतः महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिल्लीकडे निघाले आहेत. मात्र त्यांच्यावर दबाव आणला जात असून काहींना रेल्वेतून उतरवून अनोळखी ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने १० ऑक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ५७ मेट्रो स्थानकांच्या प्रवेश-निर्गमनावर निर्बंध लावण्याची विनंती केली असून, अनेक स्थानकांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगीही नाकारली आहे.

“सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार”

CJP महाराष्ट्राच्या राज्य प्रवक्त्या त्रिशा पुदके आणि राज्य प्रवक्ते सुशील कुमार यांनी व्हिडिओ संदेशातून या कारवाईचा निषेध केला.

“लोकशाहीत प्रश्न विचारायचे नाहीत, तर ते कुठे विचारायचे? उद्या १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत निवडणूक आयोगाच्या संदर्भात मोठे आंदोलन आयोजित केले आहे. त्यासाठी भारतातून, विशेषतः महाराष्ट्रातून कार्यकर्ते दिल्लीला येत आहेत. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रातून निघालेल्या CJP कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरवून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करत त्यांनी रेल्वे आणि मेट्रो निर्बंधांवरही प्रश्न उपस्थित केला.

“आम्ही संविधानाच्या मार्गाने प्रश्न विचारत आहोत. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही उत्तर मागणारच. उद्याचे आंदोलन निश्चितपणे होणार आहे,” असे CJP महाराष्ट्राने स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्र आणि संबंधित यंत्रणांना दिले आहेत. न्यायालयाने मेट्रोच्या संपूर्ण बंदीबाबत चिंता व्यक्त केली.

CJP महाराष्ट्राने आंदोलन शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने होणार असल्याचे सांगत नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related