डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुणे पोलीस आयुक्तांकडे मागणी
पुणे.धिकाऱ्याला निलंबित करून तपासापासून दूर ठेवावे, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
संबंधित महिलेने पतीकडून मारहाण, मानसिक व शारीरिक छळ, धमकी तसेच गर्भलिंग तपासणीनंतर मुलगी असल्याचे समजल्यानंतर इच्छेविरुद्ध गर्भपातासाठी दबाव आणल्याचे आरोप केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. संबंधित व्यक्ती पोलीस दलातील अधिकारी असल्याने आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा गैरवापर करून पत्नीवर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतर गर्भपातासाठी दबाव आणल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दडपशाही होऊ नये, यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे.
संबंधित अधिकारी पोलीस दलात कार्यरत असल्याने त्यांच्या पदाचा तपासावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करून तपासापासून दूर ठेवावे, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच संबंधित महिलेवर कोणताही दबाव, धमकी अथवा मानसिक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केल्या आहेत.
गर्भलिंग तपासणी व गर्भपातासंदर्भातील आरोपांची संबंधित कायद्यांनुसार स्वतंत्र चौकशी करावी. तपासादरम्यान वैद्यकीय अहवाल, कागदपत्रे, पुरावे आणि संबंधितांचे जबाब यांची योग्य पद्धतीने नोंद घेऊन तपास पारदर्शक ठेवावा. आरोप प्रथमदर्शनी सत्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कठोर विभागीय तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली.
‘महिलांच्या सुरक्षिततेबाबत शून्य सहनशीलता आवश्यक’
पोलीस दलातील अधिकारीच आपल्या पदाचा गैरवापर करून महिलेला त्रास देत असल्याचे आरोप होत असतील, तर अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत शासन आणि पोलीस प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका ठेवली पाहिजे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

