कोंढव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका; दोन तासांत ६१ जण ताब्यात

Date:

दोन महिन्यांत ८ NDPS गुन्हे, २१ आरोपींना अटक; ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, एकूण १०९ जणांवर कारवाई

पुणे, दि. २० : कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री, बाळगणे आणि सेवन याविरोधात कोंढवा पोलिसांनी आक्रमक मोहीम हाती घेतली असून, अवघ्या दोन तासांच्या विशेष मोहिमेत ६१ जणांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय मागील दोन महिन्यांत अमली पदार्थविरोधी कारवाईत एकूण १०९ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याने “अमली पदार्थ विक्री होणार नाही, बाळगले जाणार नाहीत आणि सेवन केले जाणार नाही” या उद्देशाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलीस ठाणे स्तरावर विविध प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

कोंढवा परिसरातील कमेला, शिवनेरी नगर, अश्रफनगर आणि इतर भागांतील सराईत अमली पदार्थ विक्रेत्यांच्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, NDPS कायद्यांतर्गत एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे ५ लाख ६ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, २१ जणांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय कोंढवा भागातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून २१ अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१७ ऑगस्टला विशेष मोहीम; ६१ जण ताब्यात

१७ ऑगस्ट २०२६ रोजी अमली पदार्थ विक्रीच्या हॉटस्पॉट भागात कोंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी विशेष गस्त घातली. या कारवाईदरम्यान गांजा खरेदीसाठी आलेल्या ६१ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून अमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समुपदेशन करण्यात आले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

अशाप्रकारे मागील दोन महिन्यांत एकूण १०९ लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पुढेही कठोर कारवाईचा इशारा

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अमली पदार्थ विक्री, अमली पदार्थ बाळगणे किंवा सेवन करणे याविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांना आपल्या परिसरात अमली पदार्थ विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने कोंढवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!

लोणावळा येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला जिल्हास्तरीय समितीकडून गती! पुणे दि....

रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे तातडीने हटवा : केंद्रीय मंत्री मोहोळ

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सूचना ⁠पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षितता...