अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या कार्यपद्धतीविरोधात असंख्य अधिकाऱ्यांची दुजाभावाची तक्रार,महिला अधिकाऱ्यांच्याही तक्रारी

Date:

बैठका,कामकाज वाटप व निर्णयप्रक्रियेत दुजाभाव होत असल्याची भावना; महिला अधिकाऱ्यांशी संवादातील भाषेबाबतही नाराजी,निष्पक्ष चौकशीची आयुक्तांकडे मागणी

पुणे : तब्बल १३ अधिकाऱ्यांनी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याबद्दल महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.पण हि लेखी तक्रार प्रत्यक्षात आयुक्तांपर्यंत पोहोचली नसल्याचे समजते आहे. मात्र ती माय मराठी ला दिनांक ११ ऑगस्ट रोजी प्राप्त झाली. यावरील सह्या संबधित अधिकार्यांच्याच आहेत काय ? या साठी मायमराठी ने प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटून खातर जमा करवून घेतली आहे.आता दोषी अधिकाऱ्यांना कधीही पाठीशी घालत नाहीत अशी प्रतिमा असलेले आयुक्त नवल किशोर राम यांच्या परीक्षेची घडी आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्यावर ते कारवाई करणार काय ? हा प्रश्न आता महापालिका वर्तुळात चर्चिला जातोय.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या कार्यपद्धतीबाबत महापालिकेतील विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, CO संवर्गातील अधिकाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अनेक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रशासनातील समानता, सन्मान आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, पुणे महापालिकेच्या विविध विभागांत अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने काम करीत असताना गेल्या काही काळात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून CO संवर्गातील काही अधिकाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जात असून इतर संवर्गातील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुय्यम स्वरूपाची वागणूक केली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.

विशेषतः बैठका, प्रशासकीय निर्णय, कामकाजाचे वाटप, अधिकाऱ्यांशी संवाद तसेच सार्वजनिक अथवा अधिकारी बैठकीतील वर्तन यामध्ये काही अधिकाऱ्यांना अनावश्यक प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे अन्य अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून प्रशासनातील समता आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

महिला अधिकाऱ्यांबाबतही तक्रार

निवेदनात महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अपेक्षित प्रशासकीय शिष्टाचार, सभ्यता आणि सन्मान राखला जात नसल्याची भावना काही महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बैठका, कार्यालयीन चर्चा अथवा प्रशासकीय संवादाच्या वेळी वापरली जाणारी भाषा, बोलण्याची पद्धत आणि वर्तनामुळे मानसिक त्रास व अपमानित झाल्याची भावना निर्माण होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच महापालिकेतील काही महत्त्वाचे आणि विशेष विभाग CO Cadre मधील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले असून त्या विभागांचे नियंत्रण अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे केंद्रीत होत असल्याबाबतही निवेदनात आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

सहा प्रमुख मागण्या

तक्रारदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना समान आणि सन्मानपूर्वक वागणूक देण्याबाबत प्रशासकीय निर्देश द्यावेत, कोणत्याही अधिकाऱ्याचा बैठकीत किंवा कार्यालयीन कामकाजात सार्वजनिकरीत्या अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच CO संवर्गासह सर्व संवर्गातील अधिकाऱ्यांना निर्णयप्रक्रियेत समान संधी मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही आणि महापालिकेत सकारात्मक व सन्मानपूर्ण प्रशासकीय वातावरण कायम राहील यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

याशिवाय अतिरिक्त महापालिका आयुक्त पद महापालिकेच्या अधिकारी वर्गातून भरण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्यानेही मनपा अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता...

राहुल गांधींचा दौरा उधळून लावण्याचा दुष्यंत मोहोळ यांचा इशारा

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे...

स्वातंत्र्यदिनाला रक्तदानातून समाजसेवेचा संदेश; नगरसेवक गौरव घुले यांच्या शिबिरात ३८३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे -: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत...