खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सोहम उर्फ सोन्या थोरात पोलिसांच्या ताब्यात.

Date:

  • गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई; कात्रज चौक परिसरातून सोहम उर्फ सोन्या थोरात ताब्यात

पुणे :- खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने जेरबंद केले आहे. सोहम उर्फ सोन्या मनोहर थोरात (वय २१, रा. वडगाव बुद्रुक, जाधवनगर, भैरवनाथ मंदिराजवळ, सिंहगड रोड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी तसेच गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत होते.यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, विजय पवार आणि उज्ज्वल मोकाशी यांना गोपनीय माहिती मिळाली. सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोहम उर्फ सोन्या थोरात हा कात्रज चौक परिसरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली.ही माहिती गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना कळविण्यात आली. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर युनिट-२च्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित इसमाला ताब्यात घेतले.त्याच्याकडे नाव आणि पत्त्याबाबत विचारणा केली असता त्याने आपले नाव सोहम उर्फ सोन्या मनोहर थोरात, वय २१ वर्षे, रा. वडगाव बुद्रुक, जाधवनगर, वननाथ मंदिराजवळ, सिंहगड रोड, पुणे असे सांगितले.गुन्ह्यातील त्याच्या सहभागाबाबत चौकशी केल्यानंतर तो संबंधित गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला सहकारनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत गुन्हे शाखा युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, विजय पवार, संदीप शिर्के, विद्या शिंदे, योगेश मांढरे, शिवानंद कायगुडे, शंकर कुंभार, आशिष यादव आणि विनायक बागरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वातंत्र्यदिनाला रक्तदानातून समाजसेवेचा संदेश; नगरसेवक गौरव घुले यांच्या शिबिरात ३८३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे -: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत...

हडपसरमध्ये रिक्षात विसरलेली बॅग अवघ्या १५ मिनिटांत मालकाच्या हाती

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन भागवत यांच्या तत्परतेमुळे मोबाईल, महत्त्वाची...

स्वारगेट–कात्रज मेट्रो:५.४६ किमी संपूर्ण भूमिगत मार्गावर पाच स्थानकांचे नियोजन:मार्केट यार्ड स्थानकाचे भूमिपूजन संपन्न

दृष्टिक्षेपात स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गिका : लांबी ५.४६ किलोमीटर, संपूर्ण...