शिवणे–नांदेड सिटी मुठा नदीवरील ६० कोटींच्या प्रस्तावित पुलाच्या कामाला गती; NDA परिसरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश

Date:

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्यासमवेत वारजे आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील विविध नागरी कामांची पाहणी केली. शिवणे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर तसेच सिंहगड परिसरातील प्रलंबित कामे, रस्ते, पूल, कचरा व्यवस्थापन आणि पूरस्थितीच्या समस्यांचा त्यांनी आढावा घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शिवणे ते नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवरील प्रस्तावित पुलाची आयुक्तांनी पाहणी केली. या पुलाची प्रस्तावित रुंदी २४ मीटर, लांबी सुमारे २७० मीटर असून प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे ६० कोटी रुपये आहे. नांदेड सिटीच्या बाजूने २४ मीटर रुंदीचा रस्ता विकसित झाला असून शिवणेच्या बाजूला सध्या १२ मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पुलानंतर खडकवासला धरणापर्यंत मुठा नदीवर पुरेशा रुंदीचा पूल उपलब्ध नसल्याने परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने या प्रस्तावित पुलाचे महत्त्व मोठे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागाला दिले.

यावेळी गणपती माथा, बराटे इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील नवीन पुलाचे काम तसेच विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचीही पाहणी करण्यात आली. नियमित कचरा संकलन आणि उचल करण्यासाठी किती वाहनांची आवश्यकता आहे, याचा आढावा घेऊन आवश्यक वाहनांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश वारजे आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. त्यानुसार पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागालाही करण्यात आल्या.

सिंहगड वॉर्डाच्या हद्दीतील देशमुखवाडी रस्ता तयार करणे तसेच रस्त्यावरील चेंबर समपातळीत आणण्याच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पथ विभागाला देण्यात आले.

दरम्यान, NDA च्या वॉटर कॅचमेंट एरियातून मोठ्या प्रमाणात पाणी वसाहतीमध्ये शिरत असल्याने दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. NDA परिसराशी संबंधित अन्य नागरी समस्यांवरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि NDA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नव्याने समाविष्ट गावांमधील डोअर-टू-डोअर कचरा संकलन आणि सेकंडरी वाहतुकीसाठी आवश्यक वाहनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. समाविष्ट गावांमधील नागरी समस्यांना प्राधान्य देतानाच रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

या पाहणीवेळी सभासद अनिता इंगळे, सुभाष नाणेकर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे, उपायुक्त (परिमंडळ क्र. ३) विजयकुमार थोरात, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रक्तदानातून मानवतेचा श्वास जपू : नरेंद्राचार्यजी

परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त...

राहुलजी गांधी यांचा २२ तारखेला पुण्यात ‘छात्रोंकी गूंज’ कार्यक्रम

जनजागृतीसाठी भिडे वाड्यापासूनकाढण्यात आली प्रचार रॅली पुणे : जननायक, लोकसभेतील...

अभियंत्यांनी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात- राज्यपाल

पुणे, दि. १६ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची भारताच्या आर्थिक...

‘पुणे फेस्टिव्हल अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमनपदी ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे-पुणे फेस्टिव्हल या पुण्याचे नाव जगभर नेणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाची...