राहुलजी गांधी यांचा २२ तारखेला पुण्यात ‘छात्रोंकी गूंज’ कार्यक्रम

Date:

जनजागृतीसाठी भिडे वाड्यापासून
काढण्यात आली प्रचार रॅली

पुणे : जननायक, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खा. राहुलजी गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी ज्या ऐतिहासिक भिडे वाड्यातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची क्रांती सुरू केली, त्याच वास्तूपासून पुणे शहर महिला काँग्रेसच्यावतीने प्रचार रॅली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) काढण्यात आली.

शिक्षण, रोजगार, सुरक्षा, समानता आणि स्वतःचा आवाज मांडण्याचे स्वातंत्र्य हे विद्यार्थिनींचे मूलभूत प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांसमोर आज अस्तित्वाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. सावित्रीच्या लेकी आता मात्र संघटितपणे या अन्यायाविरोधात व्यक्त होत आहेत, असे या प्रसंगी बोलताना हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सांगितले.

पुण्यात सावित्रीच्या लेकींसोबत थेट संवाद राहुलजी गांधी साधणार आहेत, अशी माहिती सपकाळ यांनी दिली..

सावित्रीबाईंच्या विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थिनींच्या हक्कांचा आणि अपेक्षांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

राहुलजी गांधींसमवेत थेट संवाद साधण्यासाठी आणि विद्यार्थिनींच्या हक्कांचा हा आवाज पुण्यातून देशभर पोहोचवण्यासाठी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन सपकाळ यांनी यावेळी केले.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर पूर्व चे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पुणे शहर पश्चिम च्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे, इंटक पुणे चे अध्यक्ष चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, अलका जोशी यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अभियंत्यांनी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात- राज्यपाल

पुणे, दि. १६ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची भारताच्या आर्थिक...

‘पुणे फेस्टिव्हल अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमनपदी ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे-पुणे फेस्टिव्हल या पुण्याचे नाव जगभर नेणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाची...

महावितरणचा वीजचोरांना तडाखा;राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

जुलै महिन्यात तब्बल ११ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश मुंबई, दि. १६ ऑगस्ट...