उबरचा भारतात मोठा विस्तार; आणखी १०० शहरांमध्ये ‘Uber Bike’ सेवा

Date:

देशभरातील उपस्थिती २२० हून अधिक शहरांमध्ये; स्वातंत्र्यदिनानिमित्त नवीन रायडर्सना पहिली राईड मोफत

पुणे , दि. १२ ऑगस्ट २०२६ : उबरने भारतातील आपल्या मोठ्या विस्ताराची घोषणा करत आणखी १०० शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारामुळे देशभरातील उबरची उपस्थिती २२० हून अधिक शहरांमध्ये पोहोचली आहे. नव्या शहरांमध्ये सुरुवातीला Uber Bike सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, लहान शहरांतील नागरिकांना परवडणारी आणि विश्वासार्ह दैनंदिन वाहतूक सुविधा देण्यावर कंपनीचा भर आहे.

जम्मूपासून तिरुनेलवेलीपर्यंत आणि सिलचरपासून जामनगरपर्यंत या विस्ताराचा व्याप असून तो १८ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेला आहे. कमी अंतराचा प्रवास, वाहतूक कोंडीतून जलद मार्ग आणि सार्वजनिक वाहतुकीपर्यंत पोहोचण्यासाठी Uber Bike हा पर्याय उपयुक्त ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे.

या विस्तारामुळे स्थानिक दुचाकी चालकांसाठीही कमाईच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे उबरने नमूद केले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उबरने नवीन ग्राहकांसाठी विशेष ऑफरही जाहीर केली आहे. पहिल्यांदाच उबर वापरणाऱ्या रायडर्सना मर्यादित कालावधीसाठी त्यांची पहिली राईड मोफत देण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उबरच्या विस्ताराचे स्वागत केले. लहान शहरांमध्ये परवडणाऱ्या प्रवासाच्या सुविधा वाढविण्यासोबतच हजारो व्यक्तींसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मोटर व्हेईकल एग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५मुळे राज्यांना बाइक टॅक्सी आणि नवीन मोबिलिटी पर्याय स्वीकारण्यासाठी स्पष्ट चौकट उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.

उबर इंडिया अँड साऊथ एशियाचे डायरेक्टर – कन्झ्युमर अँड ग्रोथ रिशांत घोष यांनी सांगितले की, महानगरांप्रमाणेच लहान शहरांमध्येही सोयीस्कर आणि परवडणाऱ्या प्रवासाची मोठी मागणी आहे. Uber Bike ही सेवा अशा बाजारपेठांसाठी विशेषतः उपयुक्त ठरत असून स्थानिक ड्रायव्हर्सनाही नियमित कमाईची संधी मिळू शकते.

उबरच्या मते, भारतातील दैनंदिन प्रवास व्यवस्थेत दुचाकींची भूमिका वाढत आहे. कमी अंतराचा प्रवास, वाहतूक कोंडी टाळणे आणि पहिल्या व शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीसाठी बाइक सेवा महत्त्वाची ठरत आहे.

Uber Bikeच्या प्रत्येक ट्रिपला अॅपमधील विविध सुरक्षा वैशिष्ट्यांचा आधार उपलब्ध आहे. यामध्ये रिअल-टाईम ड्रायव्हर आयडी चेक, SOS बटण, Share Trip Status आणि २४x७ Safety Line यांचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

उबरच्या व्यापक मोबिलिटी धोरणात बाइक आणि ऑटोसह कार, विमानतळ राइड्स, इंटरसिटी सेवा तसेच सार्वजनिक वाहतुकीशी जोडणाऱ्या पर्यायांचा समावेश आहे. ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार विविध प्रवास पर्याय उपलब्ध करून देणे हा या विस्ताराचा उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मर्सिडीज-बेंझचा भारतातील पहिला AI-आधारित ऑटोमेटेड ‘ व्हेईकल स्कॅनर’ मुंबईत सुरू

जोगेश्वरीतील ‘लँडमार्क कार्स’मध्ये मुंबईतील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर;...

मानसी नाईक यांना नृत्य वैभव पुरस्कार प्रदान 

पुणे : धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या ध्येयामागे धावत असतो; मात्र...

गोठ्यातील पारंपरिक पशुपालनापासून प्रयोगशाळेतील भ्रूणनिर्मितीपर्यंत

महाराष्ट्राच्या दुग्धव्यवसायाची नवी श्वेतक्रांती हजारो वर्षांपूर्वी मानवाने जंगलातील प्राण्यांना आपल्या...

विमान प्रवास की अग्निपरीक्षा? पाच वर्षांत पुणेकर प्रवाशांना वारंवार ‘तांत्रिक’ मनस्ताप

जरा लक्ष द्या, तुम्ही नागरी विमान राज्यमंत्री आहात हो!...