महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने मागितली २० लाखांची लाच; ५० हजार घेताना ACBच्या जाळ्यात

Date:

रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप; धानोरीत सापळा रचून कारवाई

पुणे : रुग्णालयातील कथित अनियमिततेवर कारवाई न करण्यासाठी तसेच रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू नये, यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०), क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, वर्ग-२, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महापालिका, असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पुणे पथकाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी धानोरीतील भैरवनगर परिसरातील संबंधित रुग्णालयात सापळा रचून ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या रुग्णालयातील कामकाजाबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या तक्रारीची चौकशी डॉ. चकोर यांच्याकडे होती. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी आढळलेल्या त्रुटी दूर न केल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येईल, असे सांगितल्याचा आरोप आहे.

हा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू नये आणि पुढील कारवाई टाळावी, यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

त्यानंतर तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने २४ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत डॉ. चकोर यांनी स्वतःसाठी तसेच ‘साहेबांसाठी’ ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती एसीबीने दिली.

त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी धानोरीतील भैरवनगर येथील रुग्णालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराच्या केबिनमध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. चकोर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून केला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ, सतीश वाळके आणि एसीबीच्या पथकाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सवानंतर ४८ तासांत रस्ते मोकळे करा; मांडव, कमानी, फ्लेक्स आणि रथ हटवण्याची मागणी

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर आता...

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवावे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत 'द इंडियन एक्सप्रेस'...

केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन, 4000 जण अडकले:यूपीत 65 तासांपासून वादळी पाऊस..

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने सुमारे...

हुंड्याच्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित नवविवाहितेचा मृत्यू; उंड्रीतील घटनेने खळबळ

लग्नात ४५ लाखांचा खर्च, १० तोळे सोने दिल्याचा कुटुंबीयांचा...