“दात हे शरीराच्या आरोग्याचे प्रवेशद्वार”; श्री गणेश मित्र मंडळाच्या उपक्रमाचे काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारींकडून कौतुक

Date:

गरजू नागरिकांसाठी दंत तपासणी शिबिर; सुमारे ९० जणांनी घेतला लाभ

पुणे : शरीराच्या एकंदर आरोग्यात दातांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, “दात हे शरीराच्या आरोग्याचे प्रवेशद्वार आहेत”, असे मत काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले. नवी पेठ तालीम येथील श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, पुणे-३० यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य दंत तपासणी व उपचार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

एम. ए. रंगुनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स, पुणे यांच्या सहकार्याने २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचा शुभारंभ मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव गवारे यांच्या हस्ते करण्यात आला.

समारोपप्रसंगी गोपाळदादा तिवारी म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आहे. धकाधकीच्या जीवनात दातांची योग्य निगा राखणे ही संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी आवश्यक सवय असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक अडचणी किंवा उपचारांवरील खर्चामुळे अनेक नागरिक दंत तपासणी पुढे ढकलतात. अशा परिस्थितीत आबालवृद्धांसाठी विनामूल्य तपासणी व उपचार शिबिरे उपयुक्त ठरतात, असेही तिवारी यांनी नमूद केले.

शिबिरात डॉ. उत्कर्षा देशपांडे, डॉ. उमेर शेख, डॉ. आसिफअली मुलाणी, डॉ. अदनान बागवान, डॉ. मोरेश्वर पवार आणि निलोफर पटेल यांनी नागरिकांची तपासणी केली तसेच गरजेनुसार उपचार केले. या दंत चिकित्सा शिबिराचा सुमारे ९० नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचे निमंत्रक, काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष आणि मंडळाचे कार्याध्यक्ष शेखर पवार यांनी आभार मानले. मंडळाचे अध्यक्ष सागर गोळे, तसेच आशिष शिंदे, आयुष गोळे, समर्थ पवार आणि अनिकेत काळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

याशिवाय शहर काँग्रेसचे अविनाश अडसूळ, गणेश ठोंबरे तसेच परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांचेही शिबिराला सहकार्य लाभले.

गणेशोत्सवाच्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आरोग्यविषयक उपक्रम राबवून नागरिकांना प्रत्यक्ष सेवा देण्याचा श्री गणेश मित्र मंडळाचा हा प्रयत्न परिसरातील गरजूंसाठी उपयुक्त ठरला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हुंड्याच्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित नवविवाहितेचा मृत्यू; उंड्रीतील घटनेने खळबळ

लग्नात ४५ लाखांचा खर्च, १० तोळे सोने दिल्याचा कुटुंबीयांचा...

“राहुल गांधी ‘वोट चोरी’ म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेला”; देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

निवडणूक आयोगावरील आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार; “संवैधानिक संस्थांना बदनाम...

नेपाळमध्ये पुन्हा पूर-भूस्खलनाचा कहर; ६ जणांचा मृत्यू, ५ बेपत्ता

घरे-पूल वाहून गेले, अनेक महामार्ग बंद; बुटवलमधून सुमारे १,०००...

भारतातील ३५ टक्के अविवाहितांना वारंवार एकटेपणा

७० टक्के जण नवीन सामाजिक नात्यांच्या शोधात; ७२ टक्के...