स्वातंत्र्य चळवळीमध्ये शहिद झालेल्यांची प्रेरणा घेवून युवकांनी देशाची प्रगती केली पाहिजे-दिप्ती चवधरी

Date:

पुणे-

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या हस्ते ‘‘ध्वजारोहण’’ करण्यात आला.

यावेळी बोलताना दिप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘८ ऑगस्ट १९४२ साली मुंबईमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन होते. त्या अधिवेशनामध्ये सर्वांनुमते ठराव झाला की इंग्रजांनी भारत देश सोडावा. त्यानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ‘चले जाव’ चा नारा दिला. त्याच दिवशी रात्री इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक करून तुरूंगात टाकले. ९ ऑगस्ट १९४२ ला अरूणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात तिरंगा झेंडा फडकविला. अशा अनेक महिला व लोखो सत्याग्रहींनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्या ठिकाणी पोलीसांनी सत्याग्रहींवर लाठीचार्ज केला, आश्रू गॅस सोडले व गोळीबार केला. अनेक सत्याग्रही जखमी झाले व शहिद झाले. पुण्यामध्ये १६ वर्षीय नारायण दाभाडे हे काँग्रेस भवनमध्ये तिरंगा झेंडा फडकविण्यास येत असताना ब्रिटीशांनी केलेल्या गोळीबारात ते शहिद झाले. १९४२ च्या ‘‘भारत छोडो’’ आंदोलनामुळेच भारताच्या स्वातंत्र्याला कलाटनी मिळाली. या आंदोलनात शहिद झालेल्या शहिदांना अभिवादन करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांची प्रेरणा घेवून युवकांनी देशाची प्रगती करावी.’’

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या समवेत नगरसेवक रफिक शेख, माजी नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, सचिन आडेकर, सेवादलाचे रविंद्र म्हसकर, लतेंद्र भिंगारे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, राजाभाऊ कदम, सोशल मिडयाचे गुलाम हुसेन खान, बाळासाहेब अमराळे, निलेश बोराटे, द. स. पोळेकर, आण्णा राऊत, प्रविण करपे, आबा जगताप, सुरेश कांबळे, राजेंद्र पडवळ, मधुकर राऊत, देविदास लोणकर, प्रियंका रणपिसे, दिलीप लोळगे, हरिदास अडसूळ, अमित कांबळे, किशोर मारणे, संदिप मोकाटे, सुरेश नांगरे, ॲड. बाळासाहेब बाणखेले, फैय्याज शेख, ऋग्वेदिता सपकाळ, दिपक ओव्‍हाळ, अविनाश अडसूळ, प्रथमेश आबनावे, शाम काळे, हर्षद हांडे, विक्रम शहाणे, धनंजय पाटील, अस्लम मिरजकर, योगश माखणे, चैतन्य पुरंदरे, अन्वर शेख आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या उत्सवाची सुरुवात

ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर वासा पूजन; श्री गणेश सुवर्णधाम’...

‘स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम…’

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कथन केला राष्ट्र...

पुण्यातील टेकड्यांवर बांधकाम विभागाचा’निवासी निवासी’चा खेळ

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ७ 'क प्रत' आणि...