नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. सौरभ दास यांनी कपिल सिब्बल यांच्या संपर्कात होतो, त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला मागितला होता, असं सांगितलं. कपिल सिब्बल यांनी सीजेपी आणि विद्यार्थी आंदोलकांवरील कायदेशीर लढ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. सीजेपीकडून सौरभ दास यांनी कपिल सिब्बल यांचे आभार मानले. बिहार, आसाम, पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई सुरु असल्याची माहिती सीजेपीच्या लीगल टीमकडून देण्यात आली.सौरभ दास म्हणाले की, आंदोलनादरम्यान काही लोकांनी जनहित याचिका दाखल केली होती, त्यातील काही राजकीय हेतून प्रेरित होत्या. आमची भूमिका होती की आमची चळवळ दुसऱ्या मार्गावर जाऊ नये. आम्ही कपिल सिब्बल यांच्या संपर्कात होतो. आम्ही 25 जुलै रोजी आंदोलन समाप्त करत असल्याचं जाहीर केलं होतं. आंदोलनाचं वातावरण कमी झाल्यानंतर हे सरकार वैयक्तिक पातळीवर लोकांना लक्ष्य करणं सुरु करेल, अशी शक्यता वाटत होती. कारण इतर चांगल्या आणि मोठ्या आंदोलनांमध्ये लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यात आलं. सीजेपी सर्व विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर आणि वैद्यकीय मदत देशभर करत आहे. आम्ही याच मुद्यांवर कपिल सिब्बल यांच्याकडून कायदेशीर सल्ला मागितला होता, अशी माहिती दास यांनी दिली.
कपिल सिब्बल म्हणाले की आम्हाला जी भीती वाटतेय ती विद्यार्थ्यांबाबत वाटतेय. जे उपोषणाला बसले, ज्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं त्यांच्यावर कारवाई करु नये अशी आमची इच्छा आहे. हे ऑरगॅनिक आंदोलन होतं. हेच सरकार नव्हे सरकारं कोणत्याही प्रकारे मतभेदाचा आवाज उठू नये. जे.पी. नड्डा यांनी काही आश्वासानं दिली असतील. विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना मदत करेन असं सांगितलं. बिहार, आसाम, बंगाल, महाराष्ट्रात जिथं शांततापूर्ण आंदोलनं झाली आहेत, जिथं जिथं विद्यार्थी आंदोलकांना टार्गेट करत असेल तर आपण व्यवस्था करावी, तिथं आमचे वकिल उभे राहावेत, असं कपिल सिब्बल म्हणाले.
विद्यार्थ्यांवर कारवाई करु नये, जर एफआयआर केली असेल तर ती मागं घ्यावी. सीजेपी एक रचना तयार करेल, कुठं काय झालं? कोणत्या विद्यार्थ्यावर कारवाई झालं, तिथं कोणता वकील असेल जो मदत करेल, वकील कुठं राहतात, किंवा ते कशा प्रकारची मदत करु शकतात याबाबत माहिती वकील भरतील, अशी माहिती सिब्बल यांनी दिली. कपिल सिब्बल यांनी स्वत: एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. वकिलांनी यामध्ये मदत करावी, जिथं जिथं कायद्याचा दुरुपयोग होईल तिथं आपले वकील उभे राहतील, अशी सुरुवात करत आहोत. मी एक कोटी रुपये देत आहे ते आंदोलाकांच्या संरक्षणासाठी आणि ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यासाठी या रकमेचा वापर होईल, असं कपिल सिब्बल म्हणाले. आंदोलकांच्या कायदेशीर लढाईसाठी जो खर्च होईल, त्या निर्णयात माझा सहभाग नसेल, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं.
कपिल सिब्बल म्हणाले की आंदोलनात नव्हतो. काही लोक हिंदू- मुस्लीम वाद करण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्याला भारतात होऊ द्यायचं नाही. ही मोहीम भारताच्या विकासासाठी आहे. ही सुधारणा सर्व धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र येतील तेव्हा होईल. कायदेशीर मदत करण्याची भूमिका असेल, असंही कपिल सिब्बल म्हणाले.
सीजेपीकडून एक वेबसाईट तयार केली जाणार आहे, जिल्हावार वकिलांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी काम करायचं असेल तर माहिती नोंदवावी. वकील सोबत असल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांना मदत होईल, असं सौरभ दास यांनी म्हटलं.

