‘मंडई’ च्या शारदा गजाननाचे भव्य पुष्परथातून आगमन

Date:

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंडई दुमदुमली

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष; हरिहर मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

पुणे : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमलेला मंडई परिसर, ढोल-ताशांच्या निनादाने भारावलेले वातावरण आणि फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून झालेले शारदा गजाननाचे आगमन… अशा भक्तिमय वातावरणात पुण्याचे वैभव असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे उत्सव मंडपात आगमन झाले. मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष असून, आगमनानंतर दुपारी १२ वाजता डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते हरिहर मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.

यावेळी डॉ. पराग काळकर, डॉ. सतीश देसाई, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ॲड. प्रताप परदेशी, जयंत किराड,  संजय मते, अभय थोरात,  मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते.

अखिल मंडई मंडळ ते मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशन मार्गे उत्सव मंडप असा आगमन मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीत समर्थ आणि तालचक्र ढोलपथकांसह न्यू गंधर्व बँड सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बँड पथक आणि वाद्यपथके होती.

भव्य हरिहर मंदिरात विराजमान झाले शारदा गजानन – तब्बल ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर  साकारण्यात आले आहे.  हरिहर मंदिराची संकल्पना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एकात्मतेचा संदेश देणारी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पीकरच्या भिंती नव्हे,निराधार कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप…

पुणे : गणेशोत्सव म्हटला की मोठ्या आवाजातील स्पीकर, ध्वनिप्रदूषण...

कुचिपुडीच्या विविध पैलूंचा अभूतपूर्व रंगमंचीय कलाविष्कार

गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्‌मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम् समार्चना...

‘समोरचा हिंदू असेल तरच त्याच्याकडून सामान घ्या’; नितेश राणेंचे वक्तव्य

‘आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल; हिंदूंना त्रास...

हजारो कोटींचा आमदार झाला ‘भिकारी’; घाटकोपरच्या रस्त्यावर पराग शहांचा वेगळा प्रयोग

गुरूंच्या शिकवणीतून आत्मपरीक्षणाचा प्रयत्न; वेशांतर करून नागरिकांकडून घेतली मदत,...