महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीचा ऱ्हास अस्वस्थ करणारा : लक्ष्मीकांत देशमुख

Date:

पुणे : महाराष्ट्रामध्ये आज अनेक गोष्टींची अवनती झालेली दिसते. विज्ञान, तंत्रज्ञान, भाषांतर, सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्र यांसह महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीचा ऱ्हास हा सर्वात अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे, समाजसुधारकांचा आहे, विवेकी, विज्ञाननिष्ठ आहे असे चित्र आज खोटे वाटत आहे. याचे मुख्य कारण आपल्या लोकांची वाचनसंस्कृती बद्दलची दुर्लक्षता आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

संस्कृती प्रकाशनतर्फे डॉ. सुधाकर न्हाळदे लिखित ‘वाचता वाचता लिहिले’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. प्रसिद्ध वक्ते, लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशिका सुनिताराजे पवार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजू बाविस्कर, संगीता न्हाळदे मंचावर होते.

लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरू होऊन अनेक वर्षे झाली आहेत, परंतु ती आज क्षीण झालेली दिसते. या पार्श्वभूमीवर वाचन संस्कृती पुनरुज्जीवत करायची असेल तर वाचन संस्कृतीची गरज काय हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा काळात एक चांगला वाचक स्वत: पुस्तके वाचून त्यावर विचार करून टिपणे काढून लिहू लागतो ही एकप्रकारची आस्वादक समीक्षा डॉ. न्हाळदे यांच्या पुस्तकात दिसून येते.

अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, एकांगी वाचन संस्कृतीला मारक आहे. संकुचित, एका बाजूस झुकलेली वाचन संस्कृती समाजास उपयोगी नाही. अशा वेळी डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी बहुसांस्कृतिक भूमिका स्वीकारून, विविध वाङ्मय प्रकार हाताळत, समीक्षात्मक, वैचारिक लिखाण करून ज्ञाननिष्ठ संस्कृती निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनात विवेकनिष्ठता जाणवत असून चांगुलपणाची बेरीज दिसते.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वाचन हा गंभीरपणे करण्याचा ज्ञान व्यवहार आहे. वाचन सर्वंकष असावे. एकांगी वाचनामुळे विचारप्रक्रिया एकांगी होते अशा विचार प्रक्रियेमुळे सारासार विचार करण्याची विवेक शक्ती क्षीण होते. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता होणे ही पूर्वअट आहे; तसेच उत्तम लेखक होण्यासाठी चांगला वाचक होणे गरजेचे आहे. डॉ. न्हाळदे यांनी तीन पिढ्यांतील लेखकांच्या लिखाणाचा वेध घेणारे समीक्षात्मक लेखन केले आहे. ही समीक्षा आस्वादक पद्धतीने केल्याचे जाणवते.

डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी लेखनामागील भूमिका विशद केली. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविकात प्रकाशन हा व्यवसाय आर्थिक व्यवहाराचा नसून एक सांस्कृतिक व्यवहार असल्याचे सांगत लेखकाचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्जनात्मक कार्य प्रकाशक करत असतो असे मत व्यक्त केले.

श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर शंकर मरगळे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाला खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट

गणरायाचे घेतले दर्शन; मंडळाच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची...

ऋषीपंचमीनिमित्त पुण्यात श्री गजानन महाराजांच्या चरणी भाविक नतमस्तक

नारायण पेठ आणि कोथरूडमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; हजारो भाविकांची उपस्थिती पुणे...

प्रभात रस्त्यावरील बुलढाणा अर्बनमध्ये सुमारे ३५ कोटींचा गैरव्यवहार; शिरीष देशपांडे, योगिनी पोकळे यांच्यावर गुन्हा

कर्जवाटप, व्याजमाफी, बनावट कागदपत्रे आणि खात्यांतील रक्कम वळवल्याचा आरोप;...

मुंबईत पोलिसांसाठी ४० हजार घरे; ७४ भूखंडांवर उभारणार ‘पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’

२० हजार कोटींचा प्रकल्प; साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन, हरेगावच्या...