‘आरतीचे आर्त’मधून अनुभवल्या अपरिचित आरत्या आणि अपरिचित चाली

Date:

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे कै. राजाभाऊ नातू याच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

पुणे : परिचित आरत्यांच्या अपरिचित चाली आणि परिचित चालींवरच्या अपरिचित आरत्या यांचे सप्रयोग सादरीकरण पुणेकरांना ऐकावयास मिळाले. निमित्त होते महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित कै. राजाभाऊ नातू यांच्या ३२व्या स्मृतिदिनानिमित्त ‘आरतीचे आर्त’ या अनोख्या कार्यक्रमाचे!

भरत नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘पंढरपूरीच्या जगदात्म्यासी स्मरूनि कथा आरंभितो’ या नांदीने झाली. यानंतर आरतीचा कटाव सादर करण्यात आला. ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती नेहमीपेक्षा वेगळ्या चालीवर ऐकविण्यात आली. त्यानंतर श्री गजाननाचीच ‘आरती मी करीन तुला’ ही रचना सादर करण्यात आली. ‘गणराज गजानन हो सिंधू आनंदाचा’ या रचनेनंतर संत रामदास रचित शिवशंकरांची ‘लवलवथी विक्राळा’ ही राग शंकरामध्ये रचलेली आरती सादर झाली. कोकणातील आरती गायन परंपरेत काही कडवी दुगुन, तिगुन लयित गायली जातात, याची झलकही या निमित्ताने ऐकावयास मिळाली.

संत नामदेव महाराज रचित ‘उठा उठा पांडुरंगा’ हा काकडा, ‘ओवाळू आरती पाहू सुंदर मेघ:श्याम’ या रचनाही प्रभावीपणे सादर करण्यात आल्या. संत एकनाथ महाराज रचित श्रीकृष्णावर रचलेली ‘ओवाळू आरती मदनगोपाळा’मधून श्रीकृष्णाचे लडिवाळ दर्शन घडले. संत ज्ञानश्र्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्यावर रचलेल्या आरत्या देखील सादर करण्यात आल्या.

नाट्यसंगीतातील नांदीच्या चालीवर रचलेली भगवान विष्णूंची ‘लक्ष्मीरमणा भवभय हरणा’ ही आरती सुमधुरपणे सादर झाली. तसेच नारदमुनींवर रचलेली ‘जय जयाजि देवर्षी नारदा ही अनोखी रचनाही विशेष भावली. टेंबेस्वामी रचित दत्तजन्माची सूचक कथा सांगणारी ‘करितो प्रेमे तुज निरांजन’ या आरतीने भक्तीरसाची अनुभूती दिली.

राष्ट्रसंत रामदास महाराज रचित मारुतीरायांवरील ‘कोटीच्याही कोटी गगनी’ ही आरती वीररस उत्पन्न करणारी होती. तर ‘जय जय अंजनी बाळा’ यातून मारुतीरायांचे लोभस दर्शन घडले. ‘जय जयाजी शनिदेवा’ ही शनिदेवांवर रचित आरती नाट्यसंगीताच्या चालीवर ऐकविण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ रसिकांना विशेषत्वाने भावली तर रेव्हरंड टिळक यांनी रचलेली भारतमातेची संस्कृत भाषेतील ‘वन्देत्वां भू देवी’ ही आरती वैशिष्ट्यपूर्ण ठरली. कार्यक्रमाची सांगता ‘रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा’ ही पांडुरंगावर रचित परिचित आरती अपरिचित चालीवर सादर करण्यात आली. यातील काही रचनांना होनराज मावळे यांनी चाली दिल्या आहेत. यात साकी, दिंडी, दांडी, कंटाव अशा गेय्य वृत्तांचा आधार घेण्यात आला होता.

कार्यक्रमाचे लेखन, संगीत व दिग्दर्शन होनराज मावळे यांचे होते तर गायन उत्तरा पेंडसे, पार्थ कुळकर्णी, अर्णव पुजारी, जाई परांजपे, गार्गी काळे आणि होनराज मावळे यांनी केले. केदार टिकेकर (तबला), ओंकार भांडवलकर (मृदंग), तेजस वाघमारे (तालवाद्य), हिमांशू जोशी (ऑर्गन) यांनी साथसंगत केली.

साहित्यिक व सांगीतिकदृष्ट्या समृद्ध आणि वैविध्य असणाऱ्या रचनांना पुणेकर रसिकांनी भरभरून दाद देत टाळ्यांची साथ करत भक्तीरसाचा आनंद घेतला. कलाकरांचा सत्कार कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी यांनी केला. कार्यक्रमाविषयी ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीचा ऱ्हास अस्वस्थ करणारा : लक्ष्मीकांत देशमुख

पुणे : महाराष्ट्रामध्ये आज अनेक गोष्टींची अवनती झालेली दिसते....

आशा भोसले यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात : – उषा मंगेशकर

आशा भोसले यांच्या कारकिर्दीवरील ‘देशो देशी पानो पाणी आशा...

सूर्यघर योजनेच्या प्रसारासाठी ‘सूर्यरथ’ मार्गस्थ

पुणे, दि. २७ जुलै, २०२६ : 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज...

मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार

पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोशल मिडिया...