ऋषीपंचमीनिमित्त पुण्यात श्री गजानन महाराजांच्या चरणी भाविक नतमस्तक

Date:

  • नारायण पेठ आणि कोथरूडमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; हजारो भाविकांची उपस्थिती

पुणे : ऋषीपंचमीच्या पवित्र मुहूर्तावर पुण्यात संतशिरोमणी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय आणि कोथरूडमधील तिवारी गजानन महाराज मंदिर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.नारायण पेठेतील केसरी वाड्यासमोरील गुप्ते मंगल कार्यालयात श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे यांच्या वतीने ऋषीपंचमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी या उत्सवाला उपस्थित राहून श्रींची आरती व दर्शन घेतले.यावेळी दीपक मानकर म्हणाले, “श्री गजानन महाराजांची भक्ती आणि त्यांचे विचार आपल्या जीवनाला श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेची प्रेरणा देतात. ऋषीपंचमीच्या या पवित्र दिनी श्रींच्या चरणी प्रार्थना करून सर्व भाविकांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी मनोकामना आहे.”गुप्ते मंगल कार्यालयात सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे सामुदायिक अभिवाचन, अभिषेक आणि आरती पार पडली. संध्याकाळी शोभा टिळक यांच्या ‘प्रसाद भक्तीगीत मंडळा’चे भजन झाले. त्यानंतर गायिका चित्रा आपटे, समीर चितळे आणि मीनल देशपांडे यांच्या ‘भक्ती-संध्या’ या विशेष अभंग व भक्तीगीतांच्या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्सवाचे नियोजन माधुरी जोशी आणि मनिषा ब्राह्मणकार यांनी केले.दरम्यान, कोथरूड येथील रामबाग कॉलनीतील श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट संचलित तिवारी गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराजांचा ११६ वा महानिर्वाण दिन आणि मंदिराचा २९ वा वर्धापन दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला. या सोहळ्याला नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी उपस्थित राहून दुपारच्या महाआरतीचा मान स्वीकारला व श्रींचे दर्शन घेतले.यावेळी हर्षवर्धन मानकर म्हणाले, “संतांचे विचार आणि त्यांची शिकवण समाजाला सदैव सकारात्मक दिशा देणारी असते. श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदावे, हीच मनोभावे प्रार्थना आहे.”तिवारी गजानन महाराज मंदिरातील कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता महाअभिषेकाने झाली. त्यानंतर सुरेखा कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती, श्री योगदा पौरोहित्य मंडळाचे अथर्वशीर्ष पठण आणि किरण प्रभू यांचे अध्याय वाचन झाले. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी स्वरूपानंद भजनी मंडळ आणि श्री गजानन भजनी मंडळाचे भजन झाले. त्यानंतर महाआरती तसेच योगिनी पित्रे यांचा ‘मोगरा फुलला’ हा भजन व भक्तीगीतांचा कार्यक्रम पार पडला.दोन्ही ठिकाणी दिवसभर धार्मिक विधी, भजन, अभंग आणि भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने श्री गजानन महाराजांचे दर्शन घेत ऋषीपंचमीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाला खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट

गणरायाचे घेतले दर्शन; मंडळाच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची...

प्रभात रस्त्यावरील बुलढाणा अर्बनमध्ये सुमारे ३५ कोटींचा गैरव्यवहार; शिरीष देशपांडे, योगिनी पोकळे यांच्यावर गुन्हा

कर्जवाटप, व्याजमाफी, बनावट कागदपत्रे आणि खात्यांतील रक्कम वळवल्याचा आरोप;...

मुंबईत पोलिसांसाठी ४० हजार घरे; ७४ भूखंडांवर उभारणार ‘पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’

२० हजार कोटींचा प्रकल्प; साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन, हरेगावच्या...

ऑटोरिक्षा परवान्यांसाठी मुदतवाढ

इरादापत्र आणि बदली वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णय पुणे...