- गणरायाचे घेतले दर्शन; मंडळाच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची घेतली माहिती
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाला सदिच्छा भेट देत मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती घेतली.भोलेनाथ मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते सुप्रिया सुळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतही यावेळी चर्चा झाली.याप्रसंगी नगरसेवक हर्षवर्धन मानकर, नगरसेवक काका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, विशाल तांबे, राजवर्धन हर्षवर्धन मानकर यांच्यासह भोलेनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.सुप्रिया सुळे यांच्या भेटीमुळे मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

