इरादापत्र आणि बदली वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णय
पुणे : परवाना बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी ऑटोरिक्षा व टॅक्सींच्या इरादापत्र तसेच बदली वाहनांच्या नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
१ जानेवारी २०२६ किंवा त्यानंतर १८० दिवसांची मुदत संपलेल्या इरादापत्रांना, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज केल्यास एकदाच १८० दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच ९ मार्च २०२६ पर्यंत नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या, मात्र नोंदणी क्रमांक न मिळालेल्या प्रकरणांनाही ही मुदतवाढ लागू राहणार आहे.
याशिवाय, बदली वाहनांच्या नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२६ नंतर रिप्लेसमेंट घेणाऱ्या परवानाधारकांना रिप्लेसमेंटच्या दिनांकापासून कमाल एक वर्षाची मुदत मिळणार आहे.
निर्धारित मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित परवाने रद्द करण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

