मुंबई, दि 3 जुलै: मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
संकटसमयी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी विविध महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आपले २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत.
- मुंबई (BMC) हेल्पलाईन: १९१६
- ठाणे महानगरपालिका: ०२२-२५३६४७७९, ०२२-२५३०१७४०, +९१ ९३७२३ ३८८२७
- ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन: १८००-२२२-१०८ / ८६५७८८७१०१
- पालघर जिल्हा नियंत्रण कक्ष: ०२५२५-२९७४७४, +९१ ८२३७९ ७८८७३
- पनवेल महानगरपालिका: ०२२-२७४५८०४० / ४१ / ४२
पावसाची आजची आकडेवारी (सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत)
राज्यात आज ठिकठिकाणी झालेल्या पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे.
- महाबळेश्वर: ८५ मिमी
- कुलाबा (मुंबई): ३७ मिमी
- माथेरान / नवी मुंबई: ३० मिमी
- सातारा: १८ मिमी
- नाशिक: १६ मिमी
- रत्नागिरी: १३ मिमी
- पुणे / कोल्हापूर: १२ मिमी


