‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुण्यात आंदोलन:अभिजीत दिपकेंच्या सरकारकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

Date:

पुणे-

कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन केले . पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले यावेळी आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी विविध अशयांचे पोस्टर्स सोबत आणले होते. एका पोस्टरवर लिहिले होते, ‘देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि पेपर फोडण्यात धर्मेंद्र’. एकूणच विद्यार्थ्यांकडून चांगलाच प्रतिसाद या आंदोलनाला मिळत असल्याचे दिसत आहे.यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांना या लोकांमुळे आत्महत्या करावी लागली आहे. तरी सुद्धा हे लोक बिनलाजासारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत. या सिस्टममुळे या विद्यार्थ्यांना जीव द्यावा लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यावर सरकारने कारवाईमध्ये बदली केली आहे, राजीनामा घेऊ शकले नाहीत.

https://www.facebook.com/MyMarathiNews/
(व्हिडीओ पहा आमच्या फेस बुक पेजवर )https://www.facebook.com/share/v/18MSWweomQ

सोनम वांगचूक म्हणाले, आपल्या देशात असे म्हटले जाते की ‘तमसो मा ज्योतिर्गमय’. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण आणि पर्यावरण हे दोन माझे मुद्दे आहेत. सत्य आणि अहिंसा माझा मार्ग आहे आणि न्याय हे माझे ध्येय आहे. पुढे ते म्हणाले, जो अन्याय परीक्षांमध्ये होत आहे, मला तर शिक्षणात मोठा अंधकार दिसत आहे. परीक्षेतही घोटाळे व्हायला लागले तर विद्यार्थी कुठे जाणार? याचे उत्तर आपण मागितले पाहिजे.

सोनम वांगचुक म्हणाले, अंधकार मधून उजाळाकडे गेले पाहिजे. शिक्षण आणि पर्यावरण हे जीवनातील महत्वाचे घटक आहे. दिपके यांनी शिक्षण अनुषंगाने आंदोलन सुरू केले हो बाब आनंददायी आहे. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य यांची भूमी आहे त्याला मी नमन करतो. शिक्षण क्षेत्रात अन्याय होत आहे. शिक्षणात मला अंधकार दिसत असून पेपर फुटीचे प्रकार दुर्देवी आहे. अशावेळी सरकार नेमके काय करत आहे. विद्यार्थी यांचे नुकसान झाल्यावर त्यांनी कुठे जायचे हा प्रश्न निर्माण होतो आहे. जे चुकीचे घडत आहे त्याला जबाबदार कोणाला तरी धरले गेले पाहिजे. सरकारने नीट परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी घेतली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करणे गरजेचे आहे जे तळागाळात जातील. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकले नाही पाहिजे. लोकशाही मध्ये लोकांनी उत्तर मागितल्यावर त्याचे उत्तर दिले गेले पाहिजे. आंदोलन सरकार विरोधात नसून ज्या चुका आहे त्या दुरुस्त करून सरकारने पुढे गेले पाहिजे. जे चाटूगिरी करतात ते खरे नसून जे दोष दाखवून देतात ते समजून घेतले पाहिजे. पर्यावरण बाबत नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. मला पुणे आणि महाराष्ट्र मधून आशेची किरण दिसत आहे. सत्य आणि अंहिसा आमचा रस्ता आहे. मीडियाने देखील सत्याची कास धरावी. पंतप्रधान यांनी मन की बात मधून मिडियाला स्वातंत्र द्यावे. मिडिया जोपर्यंत स्वच्छ नसेल तोपर्यंत खरी माहिती लोकांपर्यंत पोहचणार नाही. अहिंसामुळे दिल्ली मध्ये आंदोलनास सरकारकडून परवानगी दिली गेली. न्याय मिळवणे आपले लक्ष्य आहे.

तुमच्या सर्वांच्या शक्तीमुळे मला अटक नाही झाली- अभिजीत दिपके

यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, मला जरी अटक झाली तरी चालेल कारण मला माहीत होते की तुम्ही लोक हे आंदोलन पुढे चालवणार. तुमच्या शक्तीमुळेच मला हे लोक अटक करू शकले नाहीत. मी जेव्हा अमेरिकेतून निघालो तेव्हा माझी आई खूप रडली. जेवढी मी अमेरिकेला जाताना रडली नव्हती. कारण तिला भीती होती की माझ्यासोबत बरेवाईट होईल. ही भीती असंख्य पालकांना वाटत असते. मला हेच सांगायचे आहे की तुमच्या मुला-मुलींना बोलवण्यापासून थांबवू नका. जेलमध्ये मी जाईल, पण त्यांना बोलू द्या.

पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, जेव्हा मी हे सुरू केले यात तुमच्या सर्वांचा देखील राग होता. जंतर-मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा ते पूर्ण भरले होते. तिथल्या पेक्ष जास्त कॉकरोच पुण्यात येतील असे मी म्हटले होते आणि ते झाले आहे. आम्ही काय मागत आहोत? विद्यार्थ्यांसोबत जो अन्याय झाला आहे त्यांची जिम्मेदारी घेतली पाहिजे. कधीपर्यंत बिनलाजाप्रमाणे खुर्चीवर बसून राहणार? जे आपले विश्वगुरु आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यासाठी हे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत की तुमचा मंत्री? असा सवाल दिपके यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून विचारला.

अभिजीत दिपके म्हणाले, सोनम वांगचूक देशातील सर्वात चांगले एज्युकेशनिस्टया आहेत, त्यांना शिक्षा मंत्री करण्याच्या ऐवजी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. तुरुंगात टाकायची गरज काय आहे? जर तुम्ही नीट काम केले असते तर मला अमेरिकेतून इथे यायची गरज पडली नसती.

यापुढे हिंदू-मुस्लिम राजकारण नाही चालणार

मागच्या 10-12 वर्षात जे राजकारण सुरू आहे, त्यामुळे आपले काय नुकसान होत आहे ते आता आपल्याला कळत आहे. देशात नुसते हिंदू-मुसलमान सुरू आहे. त्यांना हेच करायचे आहे. जेव्हा तुम्ही हिंदू म्हणून किंवा मुसलमान म्हणून विचार कराल तेव्हा तुम्ही शिक्षणाचा विचार करणार नाही, महागाईचा विचार नाही करणार, यापुढे आता हिंदू-मुस्लिमचे राजकारण नाही चालणार. याच गोष्टीमुळे आपल्याकडे 40 टक्के पेक्षा जास्त बेरोजगारी आहे. आपल्याला काय मिळत आहे? रस्त्यावर खड्डे मिळत आहेत. आपल्याला कोसळणारे पूल भेटत आहेत, त्यात हिंदूही मरत आहेत आणि मुस्लिमही मरत आहेत. सगळे जग पुढे चालले आहे आणि आपण काय करतोय? यापुढे कोणीही हिंदू मुस्लिमच्या राजकारणात पडणार नाही.

20 तारखेला सगळे विद्यार्थी दिल्लीला येतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, असेही दिपके यांनी यावेळी जाहीर केले आहे. शनिवारपर्यंत राजीनामा नाही घेतला तर आम्ही 20 तारखेला दिल्लीत येणार, असा पुन्हा एकदा इशारा दिपके यांनी दिला आहे.

टीकेला प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की हे अराजक तत्त्व आहे. मला त्यांना विचारायचे आहे, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक आहे का? संविधान हातात घेतले होते, त्याला अराजक म्हणाले होते, मला सांगा संविधानात कुठे लिहिले आहे की पहाटे शपथविधी घेऊ शकता? असा सवाल देखील अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे.

मागण्या:

1.पेपरलीक जेव्हा जेव्हा होईल तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला 10 हजार देण्यात यावे. जर एखादी परिसखा ऐनवेळी रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली तर सरकारने विद्यार्थ्यांना ताबडतोब 10 हजार रुपये भरपाई दिली पाहिजे. परीक्षा रिजल्टला जितके महीने उशीर होईल तसेच रिजल्ट उशिरा लागला तर प्रत्येक विद्यार्थ्याला रिजल्टला जितके महीने उशीर होईल तितके महीने प्रती महिना 10 हजार द्यावे लागतील.

  1. 72 तासांच्या आत बॅकअप डेलि एक्झॅमचे आयोजन केले पाहिजे. प्रत्येक मोठ्या परीक्षेचा बॅकअप तारीख ठरली पाहिजे.
  2. हे जे ओएसएम चालू आहे, विद्यार्थी हाताने परीक्षा लिहीत आहेत, तर ते पेपर सुद्धा तुम्हाला फिजिकलीच तपसावे लागतील. ते ऑनलाइन चेक करून चालणार नाही.
  3. उशिरा होणाऱ्या परीक्षेत वयोमार्यादेत सवलत देण्यात यावी. कारण हे तुमचे अपयश आहे, विद्यार्थ्यांचे नाही.
  4. परीक्षेच्या 7 दिवस आधी कम्प्युटर टेस्टचे ऑडिट झाले पाहिजे.

आणि अजून एक मागणी आहे की जे एनसीआरटीमधून मराठा साम्राज्याचा नकाशा काढला आहे तो परत आणावा लागेल, अशी मागणी देखील दिपके यांनी यावेळी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरात आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनावर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि डिजिटल निरीक्षण केले जाणार आहे.

या आंदोलनासाठी पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील मनुष्यबळ, वाहतूक शाखेची पथके आणि इतर विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ परिसरात आणि प्रमुख रस्त्यांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे आंदोलन आज सायंकाळी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सुरू होणार आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार, या आंदोलनात 3 ते 4 हजार विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवार सहभागी होऊ शकतात.

पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यामुळे विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतील युवक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडावे यासाठी संपूर्ण कार्यक्रमावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीचा आरोप आहे की, देशातील स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवक त्रस्त आहेत. विशेषतः नीट परीक्षा, सीबीएसई निकालांशी संबंधित वाद आणि विविध भरती प्रक्रियांतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.

6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पहिले मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक आणि पालक सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी कॉकरोचचे मुखवटे घालून निषेध नोंदवला होता. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’अभिवाचन, नृत्य, नाट्य, संगीतातून उलगडले कुसुमाग्रज

रसिक कलारंजन आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ कार्यक्रमास रसिकांची दाद पुणे : ‘गर्जा जयजयकार...

वृक्षलागवडीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख ; पावसाळ्यात व्यापक मोहीम

पुणे : शहरात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी...

शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा...

शिक्षण समितीच्या मार्फत आकांक्षा फाउंडेशनचा प्रस्ताव सादर करण्याच्या भिमालेंच्या सूचना

पुणे : पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळा पुढील...