इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने चॅटिंग: भेटण्यास गेल्यावर तरुणावर दोघांनी केला काेयत्याने हल्ला
पुणे -शहरात कधी कोणाकडे नसलेले कोयता आणि पिस्तुल आता कधी कोणाकडे सापडेल याची शाश्वती राहिलेली नाही गुन्हेगारी वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे . मागील एक महिन्यापासून एका तरुणासाेबत इन्स्टाग्राम या साेशल मिडिया साईटवर तरुणीच्या नावाने चॅटिंग करणाऱ्याने संबंधित तरुणास भेटण्यास सिंंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ बुधवारी सकाळी बाेलवले. मात्र, नंतर दाेन तरुणांनी थेट संबधित १८ वर्षीय तरुणावर काेयत्याने भररस्त्यात सपासप वार करत त्यास गंभीर जखमी केल्याा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . या घटनेत तब्बल ३१ वार सदर तरुणावर झाले असल्याचे दिसून आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.
सागर चव्हाण (वय-१८,रा.लक्ष्मीनगर, काेथरुड,पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी पाेलीसांनी धनराज सुनील पाटील (रा.नऱ्हे,पुणे) व हर्षद संदीप वांजळे (रा.वारजे ,पुणे) या दाेन आराेपींना अटक केली आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी व जखमी तरुण यांच्यात पूर्वीचे भांडण अाहे. त्याचा बदला घेण्यासाठी संबंधित अाराेपी तरुणांनी सागर चव्हाण याला इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या नावाने बनावट खाते तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर महिनाभर त्याच्याशी प्रेमाच्या गप्पा करत, त्याला बुधवारी खडकवासला परिसरात किरकिटवाडी याठिकाणी भेटण्यास बाेलवले. त्यानंतर अाराेपींनी त्याच्यावर हल्ला करण्याचा संगनमताने कट रचून, एक जुनी नंबर प्लेट नसलेली दुचाकीवर घटनास्थळी ताेंडाला रुमाल बांधून अाले. सागर चव्हाण हा त्याच्या मित्रासाेबत एकाजागी रस्त्याचे कडेला थांबलेला असताना, आ राेपींनी त्यांचे दुचाकीस लाथ मारुन ती पाडली. त्यानंतर सागर चव्हाण याच्यावर काेयत्याने सपासप वार सुरु केले. सागर याने वार चुकविण्यासाठी हात मध्ये घातला असता त्याचेवर जाेरजाेरात काेयत्याने वार केल्याने त्याच्या हातास व डाेक्यास गंभीर जखम झाली.
रक्ताच्या थाराेळयात पडलेल्या सागर याला साेडून आ राेपी दुचाकी घटनास्थळी साेडून पसार झाले. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यावर, सिंहगड पाेलीस व दराेडा प्रतिबंधक पथकाचे पाेलीस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी पसार झालेल्या आ राेपींचा शाेध सुरु केला. त्यानुसार दाेन आ राेपींना दराेडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आ हे. याबाबत पुढील तपास सिंहगड राेड पाेलीस करत अाहे.