पुणे-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते,पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, व महानगरपालिकेतील अतिरिक्त महापालिका आयुक्त ( सेवानिवृत्त )नारायण दादू सावंत उर्फ एन, डी,सावंत, वय वर्षे ८५,
यांचे शुक्रवार दिनांक ३०/८/२४,रोजी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले, रविवार दिनांक ०१/०९/२४ रोजी दुपारी १,वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले,
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन विवाहित मुले,तीन स्नुषा,दोन नातवंडे,असा परिवार आहे, अंत्यविधी प्रसंगी पुणे शहराच्या विविध भागातील तसेच राजकीय, सामजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पुणे महानगरपालिकेतील अधिकारी,कर्मचारी तसेच हेल्थकैंप, जनवाडी,गोखलेनगर, चतुरश्रृंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी झालेल्या श्रद्धांजलि सभेत मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष वसंत साळवी, मनपाच्या माजी सभासद श्रीमती लता दयाराम राजगुरू, माजी नगरसचिव रामदास जगताप, शहर अभियंता प्रशांत वाघमारे,
माजी माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, माजी मुद्रणालय व्यवस्थापक जयंत पवार, मुद्रणालयातील माजी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार,संजय मोतलिंग यांचीयाप्रसंगी श्रध्दांजलीपर भाषणे झाली,