पुणे- काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या (Pune Crime News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. गुलटेकडी येथे ही घटना घडली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.डायसप्लॉट गुलटेकडी परिसरात सुनील सरोदे ( वय -22) या तरुणाचा पूर्ववैनस्यातून धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा बिबबेवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
रोहन कांबळे आणि साहिल कांबळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपी साहिल कांबळे, रोहन कांबळे दोघे सख्खे भाऊ आहे. साहिल कांबळे हा सराईत गुन्हेगार असून मोक्का गुन्हा मधून 2023 मध्ये येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला आहे.
पूर्ववैमनस्याच्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुनील सरोदे हा डायस प्लाट परिसरात राहण्यास आहे. मोक्यातील जामिनावर सुटलेले साहिल कांबळे याने त्याचा भाऊ रोहन कांबळे याच्या मदतीने खून केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांनी या घटनेत सरोदे याचा एक साथीदार याचावर देखील जीवघेणा वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र,पूर्वीच्या वादातून कोयत्याने वार करून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.