पुणे, दि. २७ : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्याच्या हेतूने पुण्यातील नामवंत शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांची एक महत्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्यातील अधिकाधिक शिक्षणसंस्थांचे चालक, विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी श्रीरंग कुलकर्णी (मोबाईल क्र. – ९५६०४०००९५) व दीपक काळे (मोबाईल क्र. – ७९७२२४३५२५) यांच्याशी संपर्क साधता येईल.