पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोशल मिडिया वरून एक व्हिडिओ शेअर केला. मोदी म्हणाले – मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला, ते तुरुंगात सडत आहेत.
आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट (जलदगती न्यायालये) स्थापन केली आहेत. आम्ही उद्या संसदेत कठोर शिक्षेसह तरतुदी आणत आहोत. पण आपल्याला भविष्याचाही विचार करायचा आहे. आपली परीक्षा प्रणाली विश्वासार्ह असावी, यात सर्वाधिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.
नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकार कार्यदल (हायपावर टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जे परीक्षा सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल.

