सूर्यघर योजनेच्या प्रसारासाठी ‘सूर्यरथ’ मार्गस्थ

Date:

पुणे, दि. २७ जुलै, २०२६ : ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची माहिती घराघरांत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सूर्यरथ’ केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रविवारी मार्गस्थ करण्यात आला.

‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’ (NSEFI), पीडब्ल्यूसी (PwC) आणि एनर्जिवा व्हेंचर्स यांच्या सहकार्याने हा सूर्यरथ साकारण्यात आला आहे. पुण्यातील चिखली येथे रविवारी (दि. २६) खासदार जनसंपर्क सेवा अभियाना दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’च्या सूर्यरथाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व सिंहाजीराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुणे जिल्ह्यात जवळपास ५० हजार घरांवर सौर प्रकल्प उभारण्यात आले असून, राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी या सूर्यरथ शहरांत फिरणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या, मुख्य चौक आणि निवासी भागांत फिरणार आहे. या रथासोबत तज्ज्ञांचे एक पथक असेल, जे नागरिकांना सौरऊर्जा प्रणालीचे फायदे प्रत्यक्ष समजावून सांगेल. तसेच, छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान, बँक कर्जाची सुविधा आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया याबद्दल जागेवरच सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आशा भोसले यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात : – उषा मंगेशकर

आशा भोसले यांच्या कारकिर्दीवरील ‘देशो देशी पानो पाणी आशा...

मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार

पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोशल मिडिया...

‘टोलकरी’ गडकरी यांचाही राजीनामा घ्या:इथेनॉलमिश्रित इंधनाने वाहनांची वाट लावली – हर्षवर्धन सपकाळ

‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा’ असल्याचीही टीका,वाहनधारकांची पंतप्रधानांनी...

भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ; POK परत मिळवणे हाच एकमेव प्रलंबित विषय: डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...