~ ऑन–ग्राउंड आणि ई–कॉम रिटेल विस्तार योजनांची घोषणा ~
मुंबई, 27 ऑगस्ट, 2024: भारतातील घर आणि कार्यालयीन फर्निचर ब्रँडपैकी एक अग्रगण्य व गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची कंपनी, गोदरेज अँड बॉइसचा एक भाग असलेली गोदरेज इंटिरिओ आपल्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांसह बाजारपेठेतील हिस्सा, तसेच वाढीला चालना देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने ऑगस्ट 2024 पर्यंत 1,20,000 चौरस फुटांहून अधिक जागा जोडून 1,000 इंटेरिओ फर्निचर स्टोअर्सचा पल्ला गाठण्याची योजना आखली आहे. 2025 या आर्थिक वर्षात हा ब्रँड 104 नवीन स्टोअर्स देखील जोडेल, जिथे आधुनिक भारतीय घरांसाठी स्टायलिश, शोभिवंत आणि विचारपूर्वक डिझाइन केलेले फर्निचर उपलब्ध होईल.
किरकोळ विस्तारावर भाष्य करताना, गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसायाचे प्रमुख (B2C) डॉ. देव नारायण सरकार म्हणाले, “अत्याधुनिक आणि नवनवीन कल्पनांना विस्तृत किरकोळ विस्ताराची जोड देऊन आमच्या ग्राहकांना सुसज्ज घरे देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या नवनवीन उत्पादनांनी, तसेच सुविधांनी आम्ही ग्राहकाच्या मनातील आमचे स्थान दृढ करतोच, पण भारतीयांचा फर्निचरकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो आहोत. देशभरात विस्तार करण्याची आमची योजना असून, त्याप्रमाणे उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेकडील क्षेत्रांसाठी अनुक्रमे 34, 24, 19 आणि 27 नवीन स्टोअर्स सुरू करणे हे आमचे लक्ष्य आहे. ही नवीन स्टोअर्स प्रेरणेचा स्रोत ठरतील. डोळ्यांना छान वाटतील अशी आणि त्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही उत्पादने भारतीयांचे जीवनमान निश्चितच उंचावतील, तसेच आधुनिक भारतीय घरांना एक वेगळाच लूक देण्यासोबत घरातील सुखसोयीही वाढतील.”
मॉड्युलर फर्निचरवर धोरणात्मक लक्ष केंद्रित करतानाच, ग्राहकांना काय आवडतं, याचे सर्वेक्षण करणाऱ्या होमस्केप्ससारख्या संस्थांचे सर्वेक्षण अहवाल अभ्यासणे, जवळपास प्रत्येक क्षेत्रात उपस्थिती असणे आणि यासोबतच सल्लागार शोरूममधील अनुभव यामुळे हा महत्त्वपूर्ण विस्तार गोदरेज इंटेरिओला उद्योगात आघाडीवर ठेवतो. 2022 मध्ये अंदाजे 23.12 अब्ज US$ मूल्य असलेले भारतीय फर्निचर मार्केट 2026 पर्यंत 32.7 बिलियन US$ पर्यंत 10.9% च्या CAGR ने वाढेल, असा अंदाज आहे. गोदरेज इंटेरिओने यंदा 20% वाढीचे लक्ष्य ठेवले आहे आणि FY25 मध्ये 2 लाख चौ.फुटांपेक्षा जास्त जागा जोडण्याची योजना आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये 1,000 स्टोअर्सचा टप्पा ओलांडण्याची तयारी केली असून, तिच्या विस्ताराच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आपल्या भौतिक विस्ताराला पूरक म्हणून, ब्रँड आपली डिजिटल बाजूही पक्की करतो आहे. कंपनीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 17 हजारांपेक्षा जास्त पिन कोडना सेवा पुरविते, तर ई-कॉमर्स पोर्टलवर 3D रूम प्लॅनर आणि ‘व्हिज्युअल सर्च’ टूलसारख्या प्रगत डिजिटल टूल्सचे एकत्रीकरण, ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करते. या वैशिष्ट्यांमुळे ग्राहक आपल्या घरात फर्निचर कसे दिसेल, हे पाहू शकतात, यासोबतच खरेदीपूर्वीच्या चिंता दूर होतात आणि ग्राहकांचे समाधानही वाढवितात. गेल्या वर्षभरात 400 हून अधिक नवीन उत्पादने सादर केल्याने, बाजारपेठेतील अंतर भरून निघण्यासोबतच ब्रँडच्या वाढीलाही चालना मिळाली आहे. या नवीन ऑफर सौंदर्यदृष्ट्या सुखकारक डिझाइन्सवर लक्ष केंद्रित करतात, जे ग्राहकांना किफायतशीर किमतीत उपलब्ध होतानाच जीवनमान उंचावतात. ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी गोदरेज इंटेरिओच्या वचनबद्धतेला बळकटी देतात.
या व्यतिरिक्त गोदरेज इंटेरिओ हे सुसज्ज मॉडेल अपार्टमेंट्ससाठी विकासकांचा एक पसंतीचा ब्रँड आहे. हे घर घेणाऱ्यांना योग्य रंग, फॅब्रिक्स निवडण्यासोबतच सध्याच्या काळाशी मिळते जुळते असे फर्निचर निवडण्यास सहकार्य करते. सॅम्पल फ्लॅटमध्येही या गोष्टी असतात आणि त्या ग्राहकांना स्पष्ट केल्या जातात. त्यानंतर, ब्रँड नवीन घरांमध्ये ग्राहकांनी निवडलेले फर्निचर सेट करते, ज्यामुळे घरमालकांना स्वतःच्या स्टायलिश जागेत राहिल्याचा आनंद तर मिळतोच, पण सोबतच आपल्या पसंतीने त्याचे डिझाइन केल्याचेही समाधान मिळते.