Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आमदार वैभव नाईकांनी हातात रॉड घेऊन PWD चे कार्यालय फोडले

Date:

सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद देखील पाहायला मिळत आहे.ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना ही बातमी माहिती होताच त्यांनी राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. बांधकामात हरकती असताना देखील याचे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आमदार नाईक हे संतप्त होत त्यांनी हातात रॉड घेऊन थेट त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयात एंट्री करताच प्रत्येक दालनात असलेल्या टेबलवरील काचा फोडल्या. खिडक्या व खुर्च्या देखील फोडल्या. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला.

कुडाळचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या घटनेची पुष्टी करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे. ही दुःखद घटना असून, एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या किल्ल्याचा आजपर्यंत एक दगडही हलला नाही. पण 6 महिन्यांपूर्वीचा पुतळा कोसळला. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा या प्रकरणी जिल्हाभर नव्हे राज्यभर आंदोलन केले जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सातबाऱ्यावर नाव लागणार,छोटे भूखंड आता ‘विनाशुल्क’ नियमित!

महसूल विभागाची कार्यपद्धती जारी राज्यातील ६० लाख मालमत्ताधारकांसह तीन कोटी...

महाराष्ट्र बॉक्सिंग कोचिंग कमिशनच्या अध्यक्षपदी विजय गुजर यांची निवड

पुणे- महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीनंतर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुंबई...

असीम सरोदे यांची ​​​​​​​सनद रद्द करण्याच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थगिती

पुणे-असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ...