पुणे महापालिका : झाडणकामाच्या निविदेत कंत्राटदारासाठी मोठ्ठा गोंधळ

Date:

पुणे, दि २९ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व रस्ते झाडणकामाच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदेवर बुधवारी (दि. २८) सर्वसाधारण सभेत अडीच तास खडाजंगी झाली. बदललेल्या झाडणकाम धोरणावर प्रशासनाने दिलेला खुलासा नगरसेवकांना असमाधानकारक वाटल्याने प्रश्‍नांची सरबत्ती सुरू झाली. मात्र, लेखी प्रश्‍न सादर करण्याच्या सूचनेनंतर नगरसेवकांच्या प्रश्‍नांवरच जणू झाडू फिरवल्याची भावना व्यक्त करत काही सदस्यांनी नाराजीने सभात्याग केला.२० नगरसेवकांच्या भाषणांवर कात्री निविदा प्रक्रियेला किमान एक महिना स्थगिती देऊन संबंधित एजन्सीकडून सविस्तर सादरीकरण घ्यावे आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. मात्र, मागणी अमान्य करण्यात आली. भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड, सचिन मोरे आदींनी निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. दक्षता समितीने आक्षेप नोंदवूनही नियम धाब्यावर बसवून कंत्राटदाराच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. नियमानुसार सहा टक्के असलेले सर्व्हिस चार्जेस १० टक्क्यांपर्यंत वाढविल्याने महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या लांबीच्या गणनेत मोठी तफावत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. शहरात आधीपासून यांत्रिक झाडणकाम होत असलेल्या रस्त्यांवरील मनुष्यबळ कमी न करता कंत्राटदाराला सुमारे एक कोटी ६० लाखांचा अतिरिक्त लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. नवीन अटींनुसार, विभागीय आरोग्य निरीक्षक (डीएसआय) व सहाय्यक आरोग्य निरीक्षक (एएसआय) यांचे नियंत्रणाचे अधिकार कमी करून कामगारांच्या हजेरीचे अधिकार कंत्राटदाराकडेच दिल्याने गैरव्यवहाराला वाव मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. समाविष्ट गावांतील कामगारांवर अन्याय झाल्याचाही आरोप करण्यात आला. यावर अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळ वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. झाडणकाम करणारे कर्मचारी विविध विभागांत कार्यरत असल्याने स्वच्छतेवर परिणाम होत होता. कंत्राटदाराला दरवाढ दिलेली नसून केवळ मनुष्यबळ वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुचिपुडीच्या विविध पैलूंचा अभूतपूर्व रंगमंचीय कलाविष्कार

गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्‌मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम् समार्चना...

‘समोरचा हिंदू असेल तरच त्याच्याकडून सामान घ्या’; नितेश राणेंचे वक्तव्य

‘आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल; हिंदूंना त्रास...

हजारो कोटींचा आमदार झाला ‘भिकारी’; घाटकोपरच्या रस्त्यावर पराग शहांचा वेगळा प्रयोग

गुरूंच्या शिकवणीतून आत्मपरीक्षणाचा प्रयत्न; वेशांतर करून नागरिकांकडून घेतली मदत,...