पुणे महापालिका मुख्य सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांवरून गदारोळ:विरोधी नगरसेवकांनी फलक घेऊन प्रशासनाचा निषेध केला

Date:

पुणे- शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले.

सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी नगरसेवकांनी ‘वेल’मध्ये प्रवेश केला. त्यांनी हातात ‘रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता?’, ‘पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत’, ‘खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे’ आणि ‘रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे गटनेते काका चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)चे गटनेते नितीन गावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला.

नगरसेवकांनी शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप केला. पावसामुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे दररोज अपघात घडत आहेत. वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचा वाढता मनस्ताप याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी तातडीने सर्व खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने सभागृहात आंदोलन करण्याची वेळ आल्याचे विरोधी नगरसेवकांनी सांगितले.

रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, खड्डेमुक्त पुण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीलाच झालेल्या या आक्रमक आंदोलनामुळे काही काळ कामकाज ठप्प झाले. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर सभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात करण्यात आली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुचिपुडीच्या विविध पैलूंचा अभूतपूर्व रंगमंचीय कलाविष्कार

गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्‌मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम् समार्चना...

‘समोरचा हिंदू असेल तरच त्याच्याकडून सामान घ्या’; नितेश राणेंचे वक्तव्य

‘आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल; हिंदूंना त्रास...

हजारो कोटींचा आमदार झाला ‘भिकारी’; घाटकोपरच्या रस्त्यावर पराग शहांचा वेगळा प्रयोग

गुरूंच्या शिकवणीतून आत्मपरीक्षणाचा प्रयत्न; वेशांतर करून नागरिकांकडून घेतली मदत,...