पुण्यातील ४५ गुंठ्याचा भूखंड खाजगी संस्थेला देण्याचा प्रशासनाचा घाट उघड, अन फाईल गायब

Date:

पुणे, दि. २९ : महंमदवाडीतील महापालिका शाळेची जागा खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा घाट प्रशासनाने घातला असून, या प्रकरणाची फाइलच शिक्षण विभागातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करत दोषींवर निलंबनाची मागणी केली आहे.

महंमदवाडीत महापालिकेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेची जागा मोठी असून, ती घेण्यासाठी खासगी शैक्षणिक संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. जागा खासगी शाळेसाठी शैक्षणिक संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला होता. सात जुलैला भाडे निर्धारण समितीने या विषयावर चर्चा करून शाळेची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर न करता बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये थेट आणण्यात आला. त्यानंतर प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरू झाली. त्यावेळी नगरसेवकांनी महापालिकेच्या शाळेची जागा खासगी संस्थेला देण्यास आक्षेप घेतला. तसेच, या प्रस्तावासंबंधीची फाईल सभागृहात सादर करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. दरम्यान, प्रस्तावाची फाईल गहाळ झाल्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी सभागृहात सांगितले. बारवे म्हणाल्या, ‘‘महापालिकेची शाळा भाडेतत्त्वावर देण्यासंबंधी सात जुलैला भाडे निर्धारण समितीच्या बैठकीनंतर फाईल माझ्याकडे आली. मात्र, ती आमच्या कार्यालयातून कोणत्याही टेबलावर न जाता गहाळ झाली.’’ या खुलाशानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महत्त्वाच्या प्रस्तावाची फाईल गायब होणे अक्षम्य चूक आहे, हा प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी यासंबंधी शिक्षण विभागाने माझ्या कार्यालयाकडे चौकशी अहवाल सादर करावा, त्यानंतर नियमानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुचिपुडीच्या विविध पैलूंचा अभूतपूर्व रंगमंचीय कलाविष्कार

गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्‌मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम् समार्चना...

‘समोरचा हिंदू असेल तरच त्याच्याकडून सामान घ्या’; नितेश राणेंचे वक्तव्य

‘आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल; हिंदूंना त्रास...

हजारो कोटींचा आमदार झाला ‘भिकारी’; घाटकोपरच्या रस्त्यावर पराग शहांचा वेगळा प्रयोग

गुरूंच्या शिकवणीतून आत्मपरीक्षणाचा प्रयत्न; वेशांतर करून नागरिकांकडून घेतली मदत,...