पुणे-स्वतः च्या हितासाठी केलेली प्रार्थना हि मंदिराच्या भिंतीवर आदळून माघारी येते मात्र उवसग्गहरं स्तोत्र स्वार्थावर आधारित नसून परमार्थावर आधारित आहे या प्रार्थनेतील एक एक परमाणू जेंव्हा वायूमंडल मध्ये पसरतो तेंव्हा त्यात सर्व जगाचे कल्याणच कल्याण होते अशी भावना आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली, जैनधर्मीय बांधवांमध्ये उवसग्गहरं स्तोत्र “महामंगलकारी स्तोत्र” असल्याची श्रद्धा असून स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह,रोगपिडा,शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे आणि म्हणूनच मागील आठ वर्षांपासून समाजबांधवांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्यांना एकत्रितपणे जोडण्यासाठी स्तोत्राच्या आयोजनातून प्रयत्न करते अशी भावना आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली .
दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत आचार्य पद्मश्री चंदनाजी म . सा . आणि पू . श्री सुप्रियदर्शनजीं म . सा . आदीठाणा – ५ यांच्या उपस्थितीत ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक पठणाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स , बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आले होते . यावेळी जैन -अजैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती होते . आर एम डी फाऊंडेशन च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन , उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांच्या द्वारे स्तोत्र पठणाचे आयोजन केले जाते.
ज्याप्रमाणे पाण्यात कंकर टाकला असता गोल – गोल वलय तयार होते त्याच प्रमाणे उवसग्गहरं स्तोत्र पठण केल्यास सकारात्मक वलय आपल्यामध्ये येते त्याची प्रचिती सुद्धा आपल्याला आज मिळेल ती सकारात्मक ऊर्जा आज तुम्ही येथून नक्कीच घेऊन जाणार असे प्रतिपादन आचार्य पद्मश्री चंदनाजी म . सा . यांनी यावेळी उपस्थितांना केले .
या कार्यक्रमासाठी बालन ग्रुपचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन , आरएमडी स्थानकाचे अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल व सर्व पदाधिकारी , विविध जैन संस्थांचे पदाधिकारी,नामवंत उद्योजक, तसेच शोभाताई आर धारीवाल वसतिगृह एफसी रोड, शोभाबेन आर धारिवाल छात्रालय डेक्कन व शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी , विविध गणेश मंडळे , आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन- अजैन बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते. स्तोत्र पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता .