सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या त शिरले पाणी
मुसळधार पावसाने झोडपले पहाटे सकाळी 6 वाजता धरणातील विसर्ग 35574 क्युसेकने केला …नदीच्या किनारे रेड अलर्ट वर..
🔴 सतर्कतेचा इशारा* 🔴
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.
शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी. संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
🔴भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
🔴गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर
🔴शितळा देवी मंदिर डेक्कन.
🔴संगम पूल पुलासमोरील वस्ती
🔴कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
🔴होळकर पूल परिसर
पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी.असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले….
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
आज सकाळी 6 वाजता :खडकवासला 100 टक्के, पानशेत 76.31 टक्के , वरसगाव 62.74 टक्के टेमघर 57.27 टक्के भरले आहे, एकूण पाणी साठा 20.27 टीएमसी म्हणजे 69.53 टक्के एवढा आहे
पाणी शिरलेलेले सोसायटीची नावे:एकता नगरी सिंहगडरोड
1] द्वारका
2] जलपुजन
3] शारदा सरोवर
4] शाम सुंदर
वरील सोसायटीत नदी पुराचे पानी पुर्ण पार्किंग मध्ये शिरले आहे
रात्री चे अपडेट्स
पुणे: खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवून पहाटे 4 वाजता 27230 क्युसेक एवढा करण्यात आला. रात्रभर आज पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
नदीतील विसर्ग रात्री 1:00वा. 16247क्यूसेक्स करण्यात आला ,त्यानंतर ते 2 वाजता आणखी वाढवून 20691 क्युसेकने पाणी सोडण्यात येऊ लागले.
दरम्यान डेक्कन परिसरातील नदीपात्रात रस्त्यावर पाणी आल्यामुळे भिडे पूल आणि लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक बुधवारी (ता.२४) दुपारनंतर बंद करण्यात आली .
खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. खडकवासला धरण भरल्याने पाटबंधारे विभागाकडून बुधवारी सकाळी सात वाजता नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. मध्यरात्री नंतर 1 वाजता.तो आणखी वाढवून 16247क्यूसेक्स ,2 वाजता आणखी वाढवून 20691 क्युसेकने करण्यात आल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.
पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे डेक्कन परिसरात नदीपात्रातील रस्त्यावर काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाणी आले होते तेव्हाच पोलिसांनी नारायण पेठेतून भिडे पुलावरून डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड॒स लावून वाहतूक बंद केली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, वाहनचालकांनी डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे जावे, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
