जर्मनीतील आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या:मायदेशी परतताच टोकाचे पाऊल

Date:

पुणे-जर्मनीमध्ये एका नामांकित कंपनीत उच्च पदस्थ आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला तरुण आठ दिवसांपूर्वीच मायदेशी परतला होता. मात्र, कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणावात त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे घडली. अमोल सुखराज गाढवे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गाढवे हे गेल्या काही वर्षांपासून जर्मनीमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत होते. उच्चशिक्षित असलेल्या अमोल यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परदेशात करिअरमध्ये यश मिळवले होते. ते जर्मनीतील एका नामांकित कंपनीत उच्च पदस्थ आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होते. काही दिवसांसाठी ते मायदेशी आले होते आणि अवघ्या आठ दिवसांपूर्वीच पुण्याजवळील कुंजीरवाडी येथील आपल्या घरी परतले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या वादांमुळे अमोल गाढवे मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच तणावातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

परदेशात चांगली नोकरी, यशस्वी करिअर आणि कुटुंब असा संसार असताना अमोल यांनी अचानक आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे.घटनेची माहिती मिळताच कुंजीरवाडी परिसरात शोककळा पसरली. अमोल गाढवे यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. परदेशात यशस्वी करिअर घडवणाऱ्या एका तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

6 सप्टेंबर रोजी सकाळी 09:00 वाजता कुंजीरवाडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अमोल गाढवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामागील नेमके कारण काय होते, याबाबत पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत फोडली दहीहंडी..

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार ऐतिहासिक...

मालाडमध्ये दहीहंडी खेळताना विटांचा कॉलम कोसळला; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

दोरीच्या ताणामुळे कच्चा कॉलम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज; मालवणी परिसरात...

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद

गोपनीयता राखा, नशाखोरी व टवाळखोरीला आळा घाला; आरोपीला जलद...