पुणे: खडकवासला धरण 88.52 % टक्के भरले असून खडकवासला पाटबंधारे विभाग यांचेकडून नदीकाठावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी खडकवासला धरण 88.52 % टक्के क्षमतेने भरले आहे.पाऊस चालू/वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये पुढील २४ ते ४८तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.तरी पुणे महानगर पालिका व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती दक्षता घ्यावी
तसेच सर्व नागरिकांना याद्वारे सतर्क करण्यात येते की कृपया नदी पात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
दरम्यान खडकवासला धरण येथून खरीप आवर्तन-१ साठी
नवीन मुठा उजवा कालवा आज दि. २३/०७/२०२४ रोजी स १२.०० वा.सुरू असणारा १००५ क्यूसेक्स विसर्ग वाढवुण १२०५ क्युसेक करण्यात आला आहे.
तर आज पानशेत 64.64 टक्के तर वरसगाव 50.66 टक्के आणि टेमघर 44.41 टक्के भरले असून चारही धरणात एकूण 57.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. जो 16.77 टीएमसी एवढा आहे.