पुण्यात टँकरने पाणी पुरवण्यासाठी महापालिका करणार २१ कोटी चा खर्च

Date:

म्हाळुंगे, वाघोली, शेवाळेवाडी-मांजरी, वडगाव शेरीसह समाविष्ट गावांसाठी टँकर पुरवठा; एका ठेकेदाराकडे दोन मोठी कामे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध भागांसह नव्याने समाविष्ट गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २१ कोटी १० लाख रुपयांच्या आसपासचे सहा स्वतंत्र प्रस्ताव स्थायी समितीसमोर आले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी संबंधित निविदांना मान्यता देण्यासाठी हे प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवले असून, ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे. स्थायी समितीची सभा बुधवारी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

विषय क्रमांक ११२८ मध्ये नव्याने समाविष्ट २३ गावांपैकी म्हाळुंगे येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मे. श्री स्वामी समर्थ वॉटर सप्लायर्स यांची सुमारे १ कोटी ९६ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर विषय क्रमांक ११२९ अंतर्गत वाघोलीसह बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील विविध भागांसाठी सिद्धिविनायक एंटरप्रायझेसची सुमारे १ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहे.

विषय क्रमांक ११३१ मध्ये नव्याने समाविष्ट शेवाळेवाडी आणि मांजरी बुद्रुक येथे २०२६-२७ या वर्षात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मे. N.Y. Shivarkar यांची सुमारे ४ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. या निविदेसाठी केवळ दोन निविदा प्राप्त झाल्याचे कार्यपत्रिकेत नमूद आहे.

विषय क्रमांक ११३३ मध्ये वडगाव शेरी परिसरातील टँकर पाणीपुरवठ्यासाठी मे. Ajinkya Water Suppliers यांची सुमारे ४७ लाख रुपयांची निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.

यातील सर्वात मोठा प्रस्ताव विषय क्रमांक ११३४ मध्ये आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी तसेच स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध भागांना मागणीनुसार टँकरने पाणी देण्यासाठी मे. Gujar Water Services यांची ८ कोटी ४ लाख रुपयांहून अधिक रकमेची निविदा मंजुरीसाठी आहे. विशेष म्हणजे या निविदेचा दर मूळ निविदा रकमेपेक्षा ६ टक्के अधिक असल्याचे कार्यपत्रिकेत नमूद आहे. हा विषय ३ सप्टेंबरच्या बैठकीत पुढील सभेसाठी ठेवण्यात आला होता.

विषय क्रमांक ११३७ अंतर्गत उरुळी देवाची येथे २०२६-२७ मध्ये दैनंदिन टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पुन्हा मे. N.Y. Shivarkar यांची सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपयांची निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. हा विषयदेखील मागील बैठकीत पुढे ढकलण्यात आला होता.

या सहा प्रस्तावांतील मंजुरीसाठी नमूद रकमा एकत्र केल्यास त्या सुमारे २१ कोटी १० लाख रुपयांपर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे शेवाळेवाडी-मांजरी आणि उरुळी देवाची या दोन कामांची मिळून जवळपास ९ कोटी ६३ लाख रुपयांची कामे एकाच N.Y. Shivarkar या ठेकेदाराकडे जाण्याचा प्रस्ताव आहे.

कार्यपत्रिकेत या सहा कामांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या तरतुदींची एकत्रित रक्कम मात्र साधारण १० कोटी रुपये आहे. प्रस्तावांमध्ये पुढील कामे दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या आर्थिक तरतुदीनुसार करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. त्यामुळे टँकर पाणीपुरवठ्यावरील संभाव्य एकूण खर्च आणि त्यासाठी उपलब्ध असलेली सध्याची तरतूद यातील तफावतही लक्षवेधी ठरते.

नव्याने समाविष्ट गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था हा सातत्याने चर्चेचा विषय असताना, एकाच स्थायी समिती कार्यपत्रिकेत टँकर पाणीपुरवठ्यासाठी २१ कोटींपेक्षा अधिक रकमेचे सहा प्रस्ताव समोर आल्याने या खर्चावर चर्चा होण्याची शक्यता आहे. येत्या ९ सप्टेंबरच्या स्थायी समिती बैठकीत या प्रस्तावांवर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोलिसांनी परवानगी नाकारली; तरी दहीहंडीत लावणीचा कार्यक्रम,भूषण सोनावणे, अमोल काटेसह तिघांवर गुन्हा

लावणी नृत्यांगना राधा पाटीलसह आयोजकांवर बिबवेवाडी पोलिसांची कारवाई; आवश्यक...

पुणे महापालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रक्रिया सुरू

४० शिक्षकांची होणार निवड; ८ ते २२ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन...

महिलांसाठीचा निधी दृश्यमान, पुरेसा आणि त्याचा मागोवा घेता येणारा असला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला लोकप्रतिनिधी क्षमता-विकास परिषदेत ‘जेंडर रिस्पॉन्सिव्ह...