पंतप्रधानांचे संबोधन म्हणजे काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर

Date:

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

मुंबई .

महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुर्नरचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले.

काँग्रेसने जनधन-आधार-मोबाईल (JAM) आणि जीएसटीला विरोध केला हा पंतप्रधानांचा दावा म्हणजे त्यांच्या खोटारडेपणाचे उत्तम उदाहरण आहे. २९ सप्टेंबर २०१० रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथून आधारचा शुभारंभ पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह व सोनियाजी गांधी यांनी केला होता. GST सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने पुढे नेला होता; मात्र त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणा-या नरेंद्र मोदीजींनीच GST ला विरोध केला होता.

पंतप्रधानांनी माता भगिणींची माफी मागण्यापेक्षा आता लागलीच महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे. महिला आरक्षणाचा कायदा नारी शक्ती वंदना तर सप्टेंबर २०२३ मध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने मंजूर झालेला आहे.

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड झाले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा प्रयत्न करून तमाम महिलांची फसवणूक केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या मागणीनुसार कमला नेहरू रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू

पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या...

भारती विद्यापीठ परिसरात वेश्याव्यवसाय:5 मुलींची सुटका

पुणे-येथील भारती विद्यापीठ परिसरात चालणाऱ्या एक मसाज सेंटर वर...

20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

उष्माघाताने मृत्यू वाढताहेत .. मुंबई-राज्यात काही ठिकाणी वादळी...

त्यांना या पापाची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल…PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी ८:३० वाजता महिला...