भारती विद्यापीठ परिसरात वेश्याव्यवसाय:5 मुलींची सुटका

Date:

पुणे-येथील भारती विद्यापीठ परिसरात चालणाऱ्या एक मसाज सेंटर वर छाप टाकून येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून 5 मुलींची सुटका पोलिसांनी केले आहे.

या संदर्भात पोलिसांनी अधिकृत रित्या दिलेली माहिती अशी की,’दिनांक १७/०४/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ” योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटर”, स.नं ३४/३, व्यंकटेश ब्लॉसम सोसायटी, दुसरा मजला, फ्लॅट नं २०२, दत्तनगर भारती विदयापिठ रोड, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. या बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे साहयाने सदर बातमीची खात्री करुन ” योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटर”, येथे अचानक छापा टाकुन महिला मसाज सेंटर मध्ये आणलेल्या ०५ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसचे सदर मसाज सेंटर चे मालक दोन इसम यांचे विरुध्द दि.१८/०३/२०२६ रोजी भारती विदयापिठ पोलीस स्टेशन पुणे येथे भा.न्या.सं १४३(१) (३), ३ (५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वकारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, नदाफ, भुजबळ, म.पो. अंगलदार कंक, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधानांचे संबोधन म्हणजे काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया मुंबई . महिला आरक्षणाच्या आडून...

20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

उष्माघाताने मृत्यू वाढताहेत .. मुंबई-राज्यात काही ठिकाणी वादळी...

त्यांना या पापाची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल…PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी ८:३० वाजता महिला...

लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ-मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे, दि.१८: राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु...