युवक काँग्रेसचे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंदोलन

Date:

पुणे-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी युवक काँग्रेस आणि महिला युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान, “हिटलर की बात करेगा, हिटलर की मौत मरेगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध, शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची मागणी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसने सांगितले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे, पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, उमेश पवार, प्रथमेश आबनावे, प्रियांका चौधरी, ओंकार मोरे, महेश म्हेत्रे, भूषण रानभरे, अथर्व सोनार, उमेश खंदारे, आकाश भोपळे, भूषण पाटोदकर, सागर धाडवे, अक्षय बहीरट, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, करण गिल, निशांत देशमुख, मेघश्याम धर्मावत, कुणाल काळे, स्वप्निल गायकवाड, रोहित पाटोळे, मंथन सपकाळ, प्रसन्न मोरे, दिलीप देशमुख, ऋषी थोरात आणि प्राजक्ता कल्याणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थ्यांवरील अत्याचार पाहून माझे रक्त खवळतेय; लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत : नसीरुद्दीन शाह

जंतरमंतरवरील आंदोलकांवरील कारवाईचा तीव्र निषेध; भावूक होत विद्यार्थ्यांना दिला...

उद्योगजगतात आणि लोकसेवेतही व्यवस्थापन महत्वाचे :शेखर सिंह 

पुणे, २१ जुलै :  भारती विद्यापीठ  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड...

देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका : उद्धव ठाकरे

जंतरमंतरवरील आंदोलनाला ठाकरे यांची भेट; ‘केवळ सत्ताबदल नव्हे, संपूर्ण...

खडकवासला धरण ७३ टक्क्यांवर; काही तासांत विसर्गाची शक्यता

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन चार धरणांत...