काँग्रेसच्या मागणीनुसार कमला नेहरू रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू

Date:

पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, शहर सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी या संदर्भात आरोग्य विभागाकडे उष्माघात कक्ष सुरु करावा अशी मागणी केली होती, त्याचा पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले, चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ अशा त्रासांना सामोरे जात आहेत. काही जणांचा तर मृत्यूही होतो. अशा वेळी प्रकृती गंभीर असताना रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असून त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना याचा फटका बसते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून शहरभर या सुविधा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत आणि गंभीर परिणाम टाळता यावेत, या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ”महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु केला जाणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने हा कक्ष सुरु केला आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधानांचे संबोधन म्हणजे काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया मुंबई . महिला आरक्षणाच्या आडून...

भारती विद्यापीठ परिसरात वेश्याव्यवसाय:5 मुलींची सुटका

पुणे-येथील भारती विद्यापीठ परिसरात चालणाऱ्या एक मसाज सेंटर वर...

20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

उष्माघाताने मृत्यू वाढताहेत .. मुंबई-राज्यात काही ठिकाणी वादळी...

त्यांना या पापाची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल…PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी ८:३० वाजता महिला...