आदित्य ठाकरेंनी हिरोईनला मारले:लोकसभेत निशिकांत दुबेंचा आरोप; अरविंत सावंतांनी काढले गोध्रा प्रकरण, म्हणाले – ‘तडीपारा’चे नाव घेऊ का?

Date:

नवी दिल्ली -संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर (नारी शक्ती वंदन विधेयक) चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैयक्तिक आरोपांची मोठी चकमक उडाली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेत गंभीर आरोप केल्याने शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रचंड संतापले. “मी तोंड उघडले तर गोध्रा आणि तडीपारीचे किस्सेही बाहेर येतील,” अशा शब्दांत सावंतांनी भाजपला आरसा दाखवला.

केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे. विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट केली. “हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्हाला याचे कोणतेही श्रेय घ्यायचे नाही,” असे मोदींनी यावेळी नमूद केले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.

विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना अरविंद सावंत यांनी भाजपला महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून धारेवर धरले. ते म्हणाले, “महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे. आमच्या महाराष्ट्राला कलंकीत केले जात आहे. हे बिल आणले तेव्हा मनात एकच गोष्ट येतो की, हे विधेयक आताच का मंजूर करायचे आहे? जून-जुलै महिन्यात मंजूर केले जाऊ शकत नव्हते? निवडणुकीच्या वेळी का? कारण तुम्हाला माहिती होतं की, निवडणुकीच्या काळात अनेक विरोधी पक्षाचे खासदार हजर राहू शकणार नाहीत. गैरहजर राहिले तर आपल्याला बिल पास करायला सोपे होईल”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
अरविंद सावंत यांनी पुढे बोलताना, कुलदीप सेंगर कोणत्या पक्षाचे आहेत ते विसरु नका. बृजभूषण सिंह महिला सन्मान करणारे आहेत का?”, असा सवाल केला. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे विरोध करु लागले. त्यावर अरविंद सावंत यांनी सवाल केले की, “तुम्हाला बलात्कारी जास्त प्रिय आहेत का? त्याचे नाव येऊ द्या रेकॉर्डवर.”

अरविंद सावंतांच्या टीकेला उत्तर देताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेतले. “जर सेंगर आणि ब्रिजभूषण यांचा दाखला दिला जाणार असेल, तर आम्हाला आदित्य ठाकरेंबद्दलही बोलावे लागेल. कारण, आदित्यनेही हिरोईनला मारले, आम्ही त्याची चर्चा करू इच्छितो” असे निशिकांत दुबे म्हणाले.

या विधानामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आक्षेप घेत, “जे या सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे. निशिकांत दुबेंवर कारवाई व्हायला पाहिजे,” अशी मागणी केली.

निशिकांत दुबेंच्या विधानाने संतापलेल्या अरविंद सावंतांनी नाव न घेता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जुन्या प्रकरणांकडे इशारा केला. ते म्हणाले, “आम्ही जर तोंड उघडले तर सगळंच बाहेर येईल, मग गोध्रा देखील येईल. मी केवळ तुरुंगात गेलेल्या गुन्हेगारांची नावे घेतली आहेत. मला जर बदनाम करायचे असते, तर मी ‘तडीपार’ कोण होतं त्यांचं नाव घेऊ का? एपस्टीन फाईल्सचे नाव घेऊ का? मला सांगाना. माझं तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. लाईन आहे. त्यांनी माफी मागावी.”

आरक्षणाच्या तांत्रिक बाजूवर बोलताना सावंत यांनी मतदारसंघ पुनर्रचना या विषयाला विरोध दर्शवला. “महिला आरक्षण देताना खासदारांची संख्या ८४० करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ते होईपर्यंत वाट कशाला पाहता? सध्याच्या ५४४ खासदार संख्येतच आरक्षण लागू करून दाखवा, आमच्या पाठिंब्याची हिंमत आहे का?” असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेत अणू-अंतराळ संशोधन करणारे 5 वैज्ञानिक बेपत्ता

नवी दिल्ली-अमेरिकेत अणू आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू...

दिल्ली विमानतळावर पार्किंगमध्येच अकासा एअर आणि स्पाइसजेटची विमाने धडकली:विमानांचे नुकसान पण प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर गुरुवारी दुपारी २ वाजता पार्किंग परिसरात...

सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक

मध्यप्रदेश वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कौतुकोद्गार  मुंबई, दि. १५ एप्रिल २०२६: मुख्यमंत्री...