“सुनेत्रा पवारांवरील टीका म्हणजे ‘नसती उठाठेव’; न विचारता सल्ला देणाऱ्याला मूर्ख म्हणतात… आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचा हर्षवर्धन सपकाळांना खोचक टोला”

Date:

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेत्या व माजी विधानपरिषद उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक शब्दांत टीका केली. “सपकाळ यांच्या वक्तव्याला दोन शब्दांत उत्तर द्यायचे झाले तर ते म्हणजे ‘नसती उठाठेव’,” असा टोला त्यांनी लगावला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधक ज्या प्रकारची भाषा वापरत होते, त्याच प्रकारची टीका आज दुसऱ्यांविषयी करून नेमके काय साध्य करायचे आहे, हे सपकाळ यांनीच सांगावे.

सुनेत्रा पवार यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका, विधिमंडळातील कामकाज, शेतकरी, महिला तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी अभ्यासपूर्ण आणि योग्य भूमिका मांडल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासोबतच बीड जिल्ह्याची जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे सांभाळल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यामुळे “दुखतंय पोट आणि बडवतायेत डोकं,” अशी म्हण वापरत डॉ. गोऱ्हे यांनी सपकाळ यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.

“सुनेत्रा पवार यांनी काय करावे, याबाबत सल्ला देण्याचा प्रयत्न सपकाळ करत आहेत. पण मराठीत एक म्हण आहे, ‘सल्ला विचारला तरच द्यावा; न विचारता सल्ला देणाऱ्याला मूर्ख म्हणतात.’ त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतःच्या मूर्खत्वाचीच प्रचिती दिली आहे,” अशी घणाघाती टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा फुले मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करा

गाळेधारकांना विश्वासात घेऊनच भाडे निश्चित करण्याची नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू)...

‘गुंगी गुडिया’ टिप्पणी निषेधार्ह; सपकाळांनी शब्द मागे घ्यावेत—दीपक मानकर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावर माजी उपमहापौरांची प्रतिक्रिया; राजकीय...

‘सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने करा, एकामागे एक राजीनामे मागण्यासाठी नको’

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे कॉक्रोच...